निसर्गसखा : कविता आणि काव्यकोडी

सावळे आभाळ
गहिरे मेघ
उमटली गालावर
हसरी रेघ


उंच झाडे
हिरवीगार पाने
ओल्या मातीचे
मधुर तराणे


विशाल पर्वत
दाट हिरवळ
मंद हवेत
फुलांचा दरवळ


गाणारी नदी
नाचणारे पाणी
ओठावर फुलती
पाऊस गाणी


चैतन्य सारे
भरून उरावे
रोजचे दिवस
नवीन व्हावे


निसर्ग सखा
घालितो साद
साधू एकमेकांशी
सुखद संवाद



काव्यकोडी - एकनाथ आव्हाड


१) सर्कशीचा खरा प्राण
तोच आहे खरा
त्याच्याशिवाय खेळ
होत नाही पुरा


विचित्र पोशाखात
दिसे मजेदार
कोणत्या या वल्लीला
टाळ्या मिळती फार?


२) डोक्यावरी जेव्हा
फिरे तिचा हात
सुरकुतलेल्या हातांमध्ये
माया किती दाट


नंबर पहिला आला की
घेते अजून पापा
कोण बरं आपल्यासाठी
असते देवबाप्पा?


३) तो नसला की
झाडही रुसते
धरणीमाय तर
गप्पच बसते


तो आल्यावर पानं
वाजवतात टाळ्या
कुणाला झेलत
हसतात कळ्या?



उत्तर -


१) विदूषक
२) आजी
३) पाऊस

Comments
Add Comment

खरे धाडस

कथा : रमेश तांबे पावसाळ्याचे दिवस होते. भरपूर पाऊस पडत होता. ओढे-नाले-नद्या दुथडी भरून वाहत होत्या. सारे जंगल

बोलल्याप्रमाणे वागावे

लहानशा गोष्टी, मोठा अर्थ : शिल्पा अष्टमकर “माणसाला त्याच्या बोलण्यावरून नव्हे तर कृतीवरून ओळखले जाते” असे आपण

मनाचा मोठेपणा

कथा : रमेश तांबे शाळेत भाषण स्पर्धेचे आयोजन केले होते. विद्याधरने नेहमीप्रमाणे आपले नाव स्पर्धेसाठी दिले होते.

सहकार्य

कथा : प्रा. देवबा पाटील आदित्यने आधीपासूनच सुभाषला काहीतरी मदत करण्याचा आपल्या मनाशी ठाम निश्चय केलेला होताच.

प्रार्थना

प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, अध्यात्मिक, कला-क्रीडा अशा संस्थांमध्ये

फुलासंगे मातीस वास लागे

लहानशा गोष्टी, मोठा अर्थ : शिल्पा अष्टमकर माणसाच्या आयुष्यात संगतीचे महत्त्व फार मोठे असते. एखाद्या व्यक्तीचा