Thursday, October 23, 2025
Happy Diwali

निसर्गसखा : कविता आणि काव्यकोडी

निसर्गसखा : कविता आणि काव्यकोडी

सावळे आभाळ गहिरे मेघ उमटली गालावर हसरी रेघ

उंच झाडे हिरवीगार पाने ओल्या मातीचे मधुर तराणे

विशाल पर्वत दाट हिरवळ मंद हवेत फुलांचा दरवळ

गाणारी नदी नाचणारे पाणी ओठावर फुलती पाऊस गाणी

चैतन्य सारे भरून उरावे रोजचे दिवस नवीन व्हावे

निसर्ग सखा घालितो साद साधू एकमेकांशी सुखद संवाद

काव्यकोडी - एकनाथ आव्हाड

१) सर्कशीचा खरा प्राण तोच आहे खरा त्याच्याशिवाय खेळ होत नाही पुरा

विचित्र पोशाखात दिसे मजेदार कोणत्या या वल्लीला टाळ्या मिळती फार?

२) डोक्यावरी जेव्हा फिरे तिचा हात सुरकुतलेल्या हातांमध्ये माया किती दाट

नंबर पहिला आला की घेते अजून पापा कोण बरं आपल्यासाठी असते देवबाप्पा?

३) तो नसला की झाडही रुसते धरणीमाय तर गप्पच बसते

तो आल्यावर पानं वाजवतात टाळ्या कुणाला झेलत हसतात कळ्या?

उत्तर -

१) विदूषक २) आजी ३) पाऊस

Comments
Add Comment