मुंबई: आषाढ महिन्याच्या पोर्णिमेला गुरू पोर्णिमेचा सण साजरा केला जातो. या वर्षी गुरू पोर्णिमेचा सण २१ जुलैला साजरा केला जात आहे. गुरू पोर्णिमेचा सण महाकाव्य महाभारताची रचना करणारे महर्षि देवव्यास यांना समर्पित करण्यात आला आहे. या दिवशी गुरूंसोबत गुरूचीही पूजा केली जाते.
ज्योतिषतज्ञांनुसार जे लोक गुरू पोर्णिमेच्या दिवशी चुका करतात त्यांना जीवनात कधीच यश मिळत नाही.
गुरूंच्या वाणीचा प्रत्येक शब्द तुमच्या संपत्तीवर भारी आहे. यामुळे गुरूच्या समोर कधीही आपल्या संपत्तीचा गर्व करू नये.
शास्त्रानुसार गुरूचा दर्जा हा देवापेक्षाही अधिक असतो. यामुळे गुरूच्या आसनावर कधीही बसू नये. गुरूचा अपमान म्हणजे ईश्वराचा अपमान असतो.
गुरूंच्या जवळ बसलेले असताना त्यांच्याकडे पाठ अथवा पाय करून बसू नये. यामुळे त्यांचा अपमान होतो.
गुरूंसमोर कधीही चुकीची आणि अभद्र भाषेचा प्रयोग करू नका. गुरूच्या मनाला ठेस पोहोचेल असे अपशब्द कधीही वापरू नका.
गुरूंबद्दल कधीही चुकीचे अथवा त्यांच्याबद्दल वाईट इतरांकडे बोलू नका. जर दुसरी व्यक्ती असे करत असेल तर त्याला रोखण्याचा प्रयत्न करा.