पेण(देवा पेरवी)- नवी मुंबईतील अक्षता म्हात्रे हिच्या हत्येच्या विरोधात आज पेण शहरात निषेध मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात शेकडोच्या संख्येने महिला व पुरुष सहभागी झाले होते.
नवी मुंबईत अक्षता कुणाल म्हात्रे हिच्यावर अत्याचार करून तिचा निर्गुण खून केल्याच्या निषेधार्थ पेण मधील नारी शक्ती मंच, शिवप्रेमी संघटना, सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्तान व इतर पाहिले संघटना यांच्या वतीने हा निषेध मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चात नगरसेविका वसुधा पाटील, नारी शक्तीच्या नंदा म्हात्रे, मोहिनी गोरे, शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख दिपश्री पोटफोडे, मुस्कान झटाम, रायगड जिल्हा संपर्कप्रमुख विष्णू पाटील, सह्याद्री प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष समीर म्हात्रे, माजी सरपंच महेंद्र ठाकूर, भाजपचे बंडू खंडागळे, सामाजिक कार्यकर्ते राजन झेमसे, सीआर म्हात्रे, योगेश पाटील यांच्यासह विविध सामाजिक संघटना व विविध पक्षांचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, महिला व तरुण वर्ग मोठ्या संख्येने सामील झाले होते.
यावेळी निषेध व्यक्त करताना नंदा म्हात्रे, विष्णू पाटील, समीर पाटील यांनी बोलताना सांगितले की, झालेला प्रकार हा माणुसकीच्या नात्याला काळिमा फासणारा आहे. दोन वर्षांपूर्वी पेण मध्ये देखील एका लहान बालिकेवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना घडली होती. त्यानंतर एका विवाहितेवर अत्याचार करून तिचा खून केल्याची ही घटना अतिशय गंभीर आहे. त्यामुळे शासनाने हा खटला जलद गती न्यायालयात चालवावा व यातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली.
ऑर्लँडो : अमेरिकेतील ऑर्लँडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Orlando International Airport) डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली. मात्र,…
मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…
मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…
मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…
कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…
येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…