Tuesday, April 22, 2025
HomeदेशNEET UG Exam : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नीट युजीचा निकाल पुन्हा एकदा...

NEET UG Exam : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नीट युजीचा निकाल पुन्हा एकदा जाहीर!

कसा पाहायचा निकाल?

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) NEET प्रकरणी १८ जुलै रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान मिळालेल्या सूचनांचे पालन करून NTA ने आज, २० जुलै रोजी NEET उमेदवारांचे निकाल पुन्हा जाहीर केले आहेत. परीक्षार्थी अधिकृत वेबसाइट exams.nta.ac.in/NEET/ वर जाऊन त्यांचे सुधारित स्कोअर कार्ड डाउनलोड करू शकतात. सर्वोच्च न्यायालयाने एनटीएला आज दुपारी १२ वाजेपर्यंत निकाल जाहीर करण्यासाठी मुदत दिली होती. ही मुदत संपण्यापूर्वी पाच मिनिटं आधी एनटीएकडून नीट युजीचा निकाल जाहीर करण्यात आला.

गेल्या काही दिवसांपासून नीट परीक्षेतील पेपरफुटीच्या प्रकरणाची देशभरात जोरदार चर्चा आहे. मे महिन्यात ही परीक्षा पार पडली होती. या परीक्षेत पेपरफुटीसह गैरप्रकार झाल्याचा आरोप झाला होता. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात ४० पेक्षा जास्त याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत राष्ट्रीय चाचणी संस्थेला अर्थात एनटीएला केंद्रनिहाय आणि शहरनिहाय निकाल जाहीर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार एनटीएकडून NEET UG परीक्षेचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत.

नेमका प्रकार काय?

यंदाच्या नीट परीक्षेचा पेपर झारखंडमधील हजारीबाग शहरात परीक्षेच्या 45 मिनिटं आधी फोडण्यात आला. त्यानंतर या पेपरमधील प्रश्नांची उत्तरं विकण्यात आल्याचा दावा एनटीएने न्यायालयात केला होता. या दाव्याविषयी सर्वोच्च न्यायालयाकडून शंका उपस्थित करण्यात आली होती. फक्त 45 मिनिटांत 180 प्रश्नांची उत्तरं सोडवून ती पेपर विकत घेणाऱ्यांना पुरवण्यात आली. ही उत्तरं पाठ करून विद्यार्थ्यांनी पेपर सोडवला, या एनटीएच्या दाव्यावर सर्वोच्च न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

कसा पाहायचा निकाल?

  • निकाल पाहण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला https://exams.nta.ac.in/NEET/ या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
  • सुधारित स्कोअर कार्ड पाहण्याची लिंक वेबसाइटच्या मुख्य पृष्ठावर आहे, या लिंकवर क्लिक करा.
  • त्यानंतर “NEET 2024 सुधारित स्कोअर कार्डसाठी ‘Click Here’ लिंकवर क्लिक करा.
  • आता अर्ज क्रमांक, जन्मतारीख आणि ईमेल आयडी किंवा मोबाइल क्रमांक आणि सेक्युरीटी पिन यांसारखी लॉगिन क्रेडेंशियल प्रविष्ट केल्यानंतर तुमचा निकाल दिसेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -