जुन्नर : गेल्या काही दिवसांत अपघाताच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली असून पुण्याच्या जुन्नरमधून आणखी एक भीषण अपघाताची घटना (Junnar Accident) समोर आली आहे. जुन्नर तालुक्यातील बेल्हे गुंळुंचवाडी येथे कल्याण नगर महामार्गावर (Kalyan Nagar Highway) भरधाव ट्रकने नागरिकांना चिरडल्याची घटना घडली. यात ३ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर ६ जण जखमी असल्याचीही माहिती आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जुन्नर तालुक्यातील बेल्हे गुंळुंचवाडी येथे ग्रामस्थ गावातील एका व्यक्तीच्या अंत्यविधीवरून परतत होते. त्यावेळी त्यांना भरधाव वेगाने येणाऱ्या एका ट्रकने चिरडलं. यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. कल्याण नगर महामार्गावर हा भीषण अपघात झाला. या अपघातानंतर गावकरी आक्रमक झाल्याची माहिती मिळत आहे. रास्ता रोकोची भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.
पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांनी सांगितले की, अहमदनगरहून येणारा ट्रक आळेफाट्याच्या दिशेने उतारावर निघाला आणि सकाळी ११:१५ च्या सुमारास अंत्यविधीसाठी गेलेल्या लोकांवर धडकला. रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तिघांमध्ये एक अल्पवयीन मुलगा आणि एका महिलेचा समावेश आहे. या अपघातात सुमारे सहा जण जखमीही झाले आहेत, अशी माहिती त्यानी दिली. पोलिसांनी जखमींना आळेफाटा येथील रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान, या अपघातामुळे एकाच वेळी ३ व्यक्तींचा मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. नागरिकांचा कल्याण नगर महामार्गावर रास्तारोको सुरु आहे. घटनास्थळी पोलीस पथकही दाखल झालं आहे.
रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…
नागपूर: विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…
बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…
नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…