Wednesday, October 29, 2025
Happy Diwali

Vastu Tips: तुळशीकडे चुकूनही ठेवू नका या गोष्टी, घरात येऊ शकतात आर्थिक समस्या

Vastu Tips: तुळशीकडे चुकूनही ठेवू नका या गोष्टी, घरात येऊ शकतात आर्थिक समस्या
मुंबई: वास्तुशास्त्रानुसार घरात तुळशीचे रोप असणे शुभ मानले जाते. असे म्हणतात की तुळशीचे रोप प्रत्येक संकटापासून घराचे आणि घरातील व्यक्तींचे रक्षण करते. हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला विशेष महत्त्व आहे. तुळस घरात लावल्याने नकारात्मक उर्जेचा नाश होतो.भारतात तुळशीच्या रोपाची पुजा केली. प्रत्येक धार्मिक कार्यात तुळशीचा वापर केला जातो. दरम्यान, काही गोष्टी तुळशीकडे ठेवणे अशुभ असते.

तुळस शिवलिंगापासून ठेवा दूर

वास्तुशास्त्रानुसार जिथे तुळस ठेवतो तिथे शिवलिंग ठेवू नये. अनेक जण तुळशीच्या कुंडीत शिवलिंग ठेवून देतात. तेथेच दोघांची पुजा करतात.

तुळशीसोबत गणपतीची पुजा नको

ज्योतिषशास्त्रानुसार तुळशीसोबत गणपतीची पुजा करू नये.

तुळशीजवळ चपला ठेवू नये

वास्तुनुसार तुळशीजवळ चपला ठेवू नये. यामुळे ती अपवित्र होते. तुळशीमातेम्ये लक्ष्मीचा वास असतो. असे केल्याने लक्ष्मी माता नाराज होते.

झाडू जवळ नको

शास्त्रानुसार तुळशीच्या रोपाजवळ कधीही झाडू ठेवू नये. झाडूचा वापर घरातील अस्वच्छता दूर करण्यासाठी केला जातो. याच कारणामुळे तुळशीजवळ झाडू ठेवू नये.
Comments
Add Comment