Tuesday, September 3, 2024
Homeताज्या घडामोडीSolapur Accident : भीषण अपघात! चालकाला अचानक फिट आल्याने भरधाव बस उलटली

Solapur Accident : भीषण अपघात! चालकाला अचानक फिट आल्याने भरधाव बस उलटली

थोडक्यात वाचला प्रवाशांचा जीव

सोलापूर : परिवहन महामंडळाच्या बसला लाल परी (ST Bus) म्हणून लाखो नागरिक तिला हक्काची पसंती देतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून एसटी बसच्या अपघाताचे (ST Bus Accident) सत्र वाढल्याचे दिसून येत आहे. अशातच सोलापूरमधूनही (Solapur News) अशीच एक घटना घडल्याचे समोर आले आहे. सोलापूरमध्ये एसटी चालकाला अचानक फिट आल्यामुळे भीषण अपघात झाला आहे. फिट आल्याने भरधाव वेगात असणारी बस पलटी होऊन रस्त्याखाली जावून कोसळल्याची माहिती मिळत आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरीही या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, टेंभुर्णीवरून कुर्डूवाडीला जात असताना हा अपघात झाला. एसटीमध्ये ३५ ते ४० प्रवासी होते. आज सकाळी कुर्डूवाडी डेपोची बस ही वैरागवरुन स्वारगेटकडे जात असताना चालकाला फिट आल्याने पिंपळनेरजवळ दुर्घटना घडली. चालकाला फिट येऊन गाडीवरचे नियंत्रण सुटल्यामुळे ही बस रस्त्याकडेला एका शेतात जावून कोसळली.
अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांनी बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. मात्र अपघातात काही प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना कुर्डूवाडी शासकीय रुग्णालयात दाखल केले असून चालकाला केबिनवरच सीपीआर दिल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, एसटी बस अपघातात वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अनेकदा या बस अपघातांना बसची दुरावस्था कारणीभूत असल्याचेही दिसून येते. तर पावसाळ्यात चक्क बसच्या टपांमधून पाणी गळत असल्याचे व्हिडिओही समोर आले आहेत. त्यामुळे रस्त्यावर धावणाऱ्या बसचा आणि बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा यानिमित्ताने पुढे आला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -