मुंबई: ज्योतिषशास्त्रानुसार गोचरचा सरळ संबंध ९ ग्रह आणि १२ राशींवर होत असतो. गोचर म्हणजे ग्रहांची चाल, जेव्हा एखादा ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा या प्रक्रियेला गोचर असे म्हणतात. ग्रहांच्या गोचरचा परिणाम व्यक्तीच्या जीवनावर होतो. ज्योतिषशास्त्रानुसार सर्व ग्रह एका निश्चित कालावधीमध्ये आपली राशी बदलतात.
सूर्याचे नक्षत्र परिवर्तन
सूर्यदेव आज १९ जुलैला नक्षत्र परिवर्तन करत आहे. आज सूर्य देव पुष्प नक्षत्रात प्रवेश करतील. याशिवाय २ ऑगस्टला सूर्य देव अश्लेषा आणि १६ ऑगस्टला मघा नक्षत्रात गोचर करतील. यानंतर १६ ऑगस्टला स्वराशी सिंहमध्ये प्रवेश करतील.
मेष रास - मेष राशीच्या व्यक्तींच्या जीवनात आर्थिक बाजू भक्कम राहील. कामाच्या ठिकाणी वृद्धी होईल. दाम्पत्य जीवनात मधुरता येईल. समाजात मान-सन्मान मिळेल आणि पद-प्रतिष्ठा वाढेल.
वृषभ रास - वृषभ राशीच्या व्यक्तींची आर्थिक बाजू सुधारेल. धनलाभ होईल. नोकरी आणि व्यापारात प्रगती होईल. ही वेळ वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी देण्याघेण्यासाठी चांगली आहे.
सिंह रास - सिंह राशीच्या व्यक्तींना मोठे यश मिळेल. जीवन आनंदाने भरून जाईल. नोकरीत प्रमोशन होईल. कामाच्या ठिकाणी कौतुक होईल. दाम्पत्य जीवनात सुख राहील. धार्मिक कार्यात आवड निर्माण होईल.
धनू रास - धनू राशीच्या व्यक्तींसाठी ही वेळ चांगली आहे. मेहनत केल्याने कामात यश मिळेल. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी वेळ शुभ आहे. या दरम्यान जोडीदाराची चांगली साथ मिळेल.
मिथुन रास - मिथुन राशीच्या व्यक्तींना धनलाभ होण्याची शक्यता आहे. आर्थिक बाजू मजबूत राहील. नोकरी आणि व्यापारासाठी ही वेळ वरदानापेक्षा कमी नाही. मान-सन्मान वाढेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी संबंध सुधारतील.