Saturday, May 10, 2025

महामुंबईताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजराजकीय

Sharad Pawar : शरद पवारांच्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने 'पिपाणी' चिन्ह गोठवलं!

Sharad Pawar : शरद पवारांच्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने 'पिपाणी' चिन्ह गोठवलं!

नेमकं प्रकरण काय?


मुंबई : राष्ट्रवादी शरद पवार गटाने (NCP Sharad Pawar Group) 'पिपाणी' चिन्हामुळे झालेल्या गोंधळावरुन निवडणूक आयोगात (Election Commission) तक्रार केल्यानंतर आयोगाने हे चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला आहे. शरद पवारांच्या मागणीनंतर हा मोठा निर्णय घेत निवडणूक आयोगाने अपक्ष उमेदवारांच्या चिन्हांमधून पिपाणी हे चिन्ह गोठवले आहे.


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला पक्षाचं मूळ नाव व 'घडयाळ' हे मूळ चिन्ह बहाल केलं. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 'तुतारी वाजवणारा माणूस' हे चिन्ह देण्यात आलं. मात्र, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत एका अपक्षाला निवडणूक आयोगाकडून पिपाणी हे चिन्ह देण्यात आलं होतं. पिपाणी हे चिन्ह तुतारीसारखेच दिसत असल्यामुळे शरद पवार गटाला लोकसभा निवडणुकीमध्ये मोठा फटका बसला असावा, अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने व्यक्त केली होती. त्यामुळे पिपाणी चिन्ह रद्द करण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली होती.


शरद पवार गटाच्या या मागणीनंतर निवडणूक आयोगाने 'पिपाणी' हे चिन्ह गोठवले आहे. आता कोणत्याही अपक्ष उमेदवाराला पिपाणी चिन्ह दिले जाणार नाही अशी माहिती आहे.


Comments
Add Comment