Tuesday, September 3, 2024
Homeताज्या घडामोडीKonkan Railway : चाकरमान्यांसाठी आनंदवार्ता! गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे सोडणार 'या' विशेष गाड्या

Konkan Railway : चाकरमान्यांसाठी आनंदवार्ता! गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे सोडणार ‘या’ विशेष गाड्या

‘असे’ असेल विशेष गाड्यांचे वेळापत्रक

मुंबई : गणेशोत्सव (Ganeshotsav) जवळ येताच हजारो चाकरमानी आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी कोकणात (Konkan) जातात. गावी जाण्यासाठी चाकरमान्यांची दोन-तीन महिने आधीच तिकीट बुकिंग (Ticket Booking) करण्यासाठी लगबग सुरु होते. तासनतास रांगेत उभे राहूनही अनेक प्रवाशांचे तिकीट कन्फर्म (Confirm) होत नसल्यामुळे प्रवाशांना ८-१२ तासांचा प्रवास उभं राहून करावा लागतो. त्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होताना दिसून येतात. प्रवाशांची हीच गरज लक्षात घेऊन रेल्वेने जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गणेशोत्सवात प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. जाणून घ्या या विशेष रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक आणि बुकिंग करण्याची तारीख. (Special Trains In Konkan)

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या एकूण सात विशेष गाड्यांचे नियोजन केले आहे. यामध्ये मुंबई- रत्नागिरी, मुंबई-कुडाळ, मुंबई – सावंतवाडी तसेच दिवा – चिपळूण या विशेष गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे. या रेल्वेचे आरक्षण २१ जुलैपासून सकाळी आठ वाजता सुरू होणार आहे. तसेच या गाड्यांचे तिकीट बुकींग रेल्वेच्या आरक्षण खिडक्यांवर तसेच सर्व अधिकृत संकेतस्थळांवर सुरू होणार आहे.

१) मुंबई सीएसएमटी -सावंतवाडी डेली स्पेशल (३६ फेऱ्या)

  • ०११५१ स्पेशल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ०१.०९.२०२४ ते १८.०९.२०२४ (१८ फेऱ्या ) पर्यंत दररोज रात्री ००:२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी १४:२० वाजता सावंतवाडी येथे पोहोचेल.
  • ०११५२ स्पेशल सावंतवाडीवरून ०१.०९.२०२४ ते १८.०९.२०२४ (१८ फेऱ्या ) दररोज १५.१० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०४.३५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल.
  • थांबे : दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ.
  • रचना: १२ स्लीपर क्लास, ०४ जनरल, २ थ्री टायर एसी आणि २ एसएलआर असे मिळून एकूण २० डबे

२) मुंबई सीएसएमटी -रत्नागिरी डेली स्पेशल (एकूण ३६ फेऱ्या)

  • ०११५३ स्पेशल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ०१.०९.२०२४ ते १८.०९.२०२४ (१८ फेऱ्या ) पर्यंत दररोज सकाळी ११:३० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री २०:१० वाजता रत्नागिरी येथे पोहोचेल.
  • ०११५४ स्पेशल रत्नागिरीवरून ०१.०९.२०२४ ते १८.०९.२०२४ (१८ फेऱ्या ) दररोज पहाटे ४ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १३:३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल.
  • थांबे: दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड
  • रचना: १२ स्लीपर क्लास, ०४ जनरल, २ थ्री टायर एसी आणि २ एसएलआर असे मिळून एकूण २० डबे

३) एलटीटी -कुडाळ डेली स्पेशल (३६ फेऱ्या)

  • ०११६७ लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून ०१.०९.२०२४ ते १८.०९.२०२४ (१८ फेऱ्या ) पर्यंत दररोज रात्री २१:०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०९:३० वाजता कुडाळ येथे पोहोचेल.
  • ०११६८ स्पेशल कुडाळवरून ०१.०९.२०२४ ते १८.०९.२०२४ (१८ फेऱ्या ) दररोज दुपारी १२:०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी मध्यरात्री ००:४० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल.
  • थांबे: ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, अंजनी, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग
  • रचना: १२ स्लीपर क्लास, ०४ जनरल, २ थ्री टायर एसी आणि २ एसएलआर असे मिळून एकूण २० डबे

४) एलटीटी -सावंतवाडी डेली स्पेशल (३६ फेऱ्या)

  • ०११७१ स्पेशल एलटीटी मुंबई येथून ०१.०९.२०२४ ते १८.०९.२०२४ (१८ फेऱ्या ) पर्यंत दररोज सकाळी ०८:२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री २१:०० वाजता सावंतवाडी येथे पोहोचेल.
  • ०११७२ स्पेशल सावंतवाडीवरून ०१.०९.२०२४ ते १८.०९.२०२४ (१८ फेऱ्या ) पर्यंत दररोज रात्री २२:२० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी १०:४० वाजता एलटीटी मुंबई येथे पोहोचेल.
  • थांबे: ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग.
  • रचना: १२ स्लीपर क्लास, ०४ जनरल, २ थ्री टायर एसी आणि २ एसएलआर असे मिळून एकूण २० डबे

५) दिवा- चिपळूण मेमू स्पेशल (एकूण ३६ फेऱ्या)

  • ०११५५ मेमू स्पेशल दिवा येथून ०१.०९.२०२४ ते १८.०९.२०२४ (१८ फेऱ्या ) पर्यंत दररोज सकाळी ०७:१५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १४:०० वाजता चिपळूण येथे पोहोचेल.
  • ०११५६ मेमू स्पेशल चिपळूणवरून ०१.०९.२०२४ ते १८.०९.२०२४ (१८ फेऱ्या ) पर्यंत दररोज दुपारी १५:३० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री २२:५० वाजता दिवा येथे पोहोचेल.
  • थांबे: दिवा, निळजे, तळोजा, कळंबोली, पनवेल, सोमाटणे, रसायनी, आपटा, जिते, हमरापूर, पेन, कासू, नागोठणे, निडी, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव, वीर, सापे वामने, करंजाडी, विन्हेरे, कळंबणी, खेड, अंजनी
  • रचना: १२ मेमू डबे

६) एलटीटी -कुडाळ स्पेशल (१६सेवा)

  • ०११८५ लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून ०२.०९.२०२४ ते १८.०९.२०२४ (८ फेऱ्या) पर्यंत सोमवार, बुधवार आणि शनिवारी रात्री ००:४५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी सकाळी १२:३० वाजता कुडाळ येथे पोहोचेल.
  • ०११८६ स्पेशल कुडाळवरून ०२.०९.२०२४ ते १८.०९.२०२४ (१८ फेऱ्या ) सोमवार, बुधवार आणि शनिवारी संध्याकाळी १६:३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी मध्यरात्री ०४:५० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल.
  • थांबे: ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड,चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग
  • रचना: १२ स्लीपर क्लास, ०४ जनरल, २ थ्री टायर एसी आणि २ एसएलआर असे मिळून एकूण २० डबे

७) एलटीटी -कुडाळ स्पेशल (६सेवा)

  • ०११६५ लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून ०३.०९.२०२४ ते १८.०९.२०२४ (3 फेऱ्या) पर्यंत मंगळवारी रात्री ००:४५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी सकाळी १२:३० वाजता कुडाळ येथे पोहोचेल.
  • ०११६६ स्पेशल कुडाळवरून ०३.०९.२०२४ ते १८.०९.२०२४ (3 फेऱ्या) पर्यंत मंगळवारी संध्याकाळी १६:३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी मध्यरात्री ०४:५० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल.
  • थांबे: ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड,चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग डब्यांची
  • रचना: १२ थ्री टायर एसी , ०५ टू टायर एसी, १ फर्स्ट एसी, १ पॅन्ट्रीकार, २ ब्रेक वॅन असे मिळून एकूण २० डबे

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -