दाम्बुला: महिला आशिया कप २०२४च्या पहिल्या सामन्यात भारताने पाकिस्तानला लोळवले. पाकिस्तानने विजयासाठी दिलेले १०९ धावांचे आव्हान भारताने ७ विकेट राखत पूर्ण केले. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वातील टीम इंडियाने पाकिस्तानला पूर्ण २० षटकेही खेळू दिली नाही. भारतासाठी दीप्ति शर्माने सर्वाधिक ३ विकेट काढल्या.
पाकिस्तानने दिलेले आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाच्या सलामीवीरांनी सुरूवातीपासूनच जोरदार फटकेबाजी केली. स्मृती मंधाना आणि शेफाली वर्मा यांनी जबरदस्त खेळी करताना भारताला हा विजय सुकर करून दिला.
स्मृती मंधानाने ३१ बॉलमध्ये ४५ धावा ठोकल्या. या खेळीदरम्यान तिने ९ चौकार ठोकले. तिने भारताच्या विजयाचा पारा रचून दिला. मंधाना बाद झाल्यानंतर काही वेळातच शेफाली वर्माही बाद झाली. तिने २९ बॉलमध्ये ४० धावा केल्या. त्यानंतर आलेल्या दयालन हेमलतालाही केवळ १४ धावा करता आल्या.
रेणुका ठाकूर, पूजा वस्त्राकार आणि श्रेयंका पाटीलने घातक गोलंदाजी केली. पाकिस्तानसाठी फातिमान सनाने नाबाद २२ धावा केल्या. तिने १६ बॉलचा सामना करताना २ षटकार आणि १ चौकार लगावला.
टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या पाकिस्तानच्या संघाला केवळ १०८ धावाच करता आल्या. पाकिस्तानचा संघ १९.२ षटकांत ऑलआऊट झाला. पाकिस्तानसाठी गुल फेरोजा आणि मुनीबा अली सलामीसाठी आल्या होत्या. मुनीबा ११ धावा करून बाद झाली तिला पूजाने बाद केले. तर फिरोज ५ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. अमीनने २५ धावांची महत्त्वाची खेळी केली. मात्र त्यासाठी तिला ३५ बॉल खर्च करावे लागले. अमीनने रेणुकाला बाद केले. आलिया ६ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली.
पाकिस्तानसाठी फातिमाने २२ धावांची महत्त्वाची खेळी केली. तिने १६ बॉलचा सामना करताना १ चौकार आणि २ षटकार लगावले. फातिमा नाबाद राहिली. हसनने १९ बॉलमध्ये २२ धावा केल्या.