Sunday, April 27, 2025
Homeक्रीडाIND vs SL: हा अन्याय आहे...रियान परागला मिळाले स्थान, अभिषेक-गायकवाड बाहेर, बीसीसीआयवर...

IND vs SL: हा अन्याय आहे…रियान परागला मिळाले स्थान, अभिषेक-गायकवाड बाहेर, बीसीसीआयवर चिडले चाहते

मुंबई: श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. सूर्यकुमार यादव टी-२० संघाचा कर्णधार बनला आहे. तर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचे वनडे संघात पुनरागमन झाले आहे. रोहित शर्मा वनडेचे नेतृत्व करणार आहे. या दौऱ्यासाठी टी-२० संघात ऋतुराज गायकवाड आणि अभिषेक शर्माला स्थान मिळालेले नाही.

त्यांनी नुकत्याच झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत चांगली कामगिरी केली होती. रियान परागला संघात संधी मिळाली आहे. चाहते मात्र यामुळे चांगलेच नाराज झालेत. ते सातत्याने आपली प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.

एका चाहत्याने ऋतुराज गायकवाडचा फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिले, हे पहिल्यांदाच घडलेले नाही की जेव्हा त्यांच्यासोबत अन्याय झाला. हे अंडर १९ संघ निवडीनंतर होतच आहे.

 

एका दुसऱ्या चाहत्याने लिहिले, ऋतुराज गायकवाड आणि अभिषेक शर्मासाठी वाईट वाटत आहे. खरंतर रियान परागपेक्षा त्यांचा हक्क आहे मात्र गिल भाईची तर मजा आहे.

 

एका इतर युजरने लिहिले की, ऋतुराज गायकवाड आणि अभिषेक शर्माची निवड झाली नाही. मात्र रियान परागला दोन्ही प्रकारांमध्ये निवडण्यात आले. असे वाटत आहे की मी वेगळ्या दुनियेत आहे.

 

टीम इंडियाच्या झिम्बाब्वेमधील ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेनंतर अभिषेक शर्मा चर्चेचा केंद्रस्थानी ठरला होता. शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघातील अभिषेकने ५ सामन्यांत ३१च्या सरासरीने १२४ धावा केल्या. मात्र त्याने या धावा १७४.६४च्या स्ट्राईक रेटने ठोकल्या. पदार्पणाच्या सामन्यात शून्यावर बाद झाल्यानंतर दुसऱ्या सामन्यात त्याने ४६ बॉलमध्ये शतक ठोकले होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -