
मुंबई: हार्दिक पांड्या(Hardik pandya) आणि नताशा(natasa) का वेगळे झाले याचे कारण समोर आले नाही मात्र अभिनेत्रीने मुलासोबत आपल्या माहेरी गेल्यानंतर चाहत्यांसमोर स्पष्ट केले की आता त्यांच्यात कोणतेही नाते राहिलेले नाही.
नताशा आणि हार्दिक यांचा घटस्फोट त्यांच्या चाहत्यांसाठी जितका शॉकिंग आहे तितकेच धक्कादायक त्यांचे लग्नही होते. हार्दिक आणि नताशा यांची पहिली भेट मुंबईच्या नाईट क्लबमध्ये २०१८मध्ये झाली होती. येथून त्यांची मैत्री सुरू झाली. नताशाला तेव्हा माहीत नव्हते की हार्दिक क्रिकेटर आहे.
पहिल्या भेटीतच हार्दिक नताशाच्या प्रेमात पडला. या भेटीनंतर हार्दिकने नताशाला आपल्या वाढदिवसाला बोलावले. ही पहिलीच वेळ होती जेव्हा दोघेही एकत्र दिसले. हार्दिकने खुद्द याची कहाणी सांगितली होती. तो म्हणाला होता, नताशाला काहीच आयडिया नव्हती की मी कोण आहे. आम्ही एकमेकांशी बोललो आणि हळू हळू जवळ येत गेलो.
त्यानंतर हार्दिक आणि नताशा अनेक पार्ट्यांमध्ये एकत्र दिसत होते. २०२०च्या आधी कधीही दोघांनी उघडपणे आपल्या नात्याचा खुलासा केला नाही. हार्दिकला वाटले की नताशा योग्य व्यक्ती आहे जिच्यासोबत तो आपले आयुष्य घालवू शकतो. यानंतर २०२०मध्ये फिल्मी स्टाईलमध्ये त्याने तिला प्रपोज केले होते.
View this post on Instagram
यातच कोरोनामुळे लॉकडाऊनची घोषणा झाली आणि एक दिवस अचानक दोघांनी आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपल्या लग्नाचे फोटो शेअर करत चाहत्यांना हैराण केले. २०२०मध्ये या जोडप्याने कोर्ट मॅरेज केले आणि काही दिवसांनी समजले की नताशा प्रेग्नंट आहे. अभिनेत्री प्रेग्नंट असल्याच्या बातमी ते पुन्हा चर्चेत आले. खरंतर चर्चा अशी सुरू झाली की अभिनेत्री लग्नाआधीच प्रेग्नंट होती. यामुळेच तिला घाई घाईत लग्न करावे लागले.
जुलै २०२०मध्ये हार्दिक आणि नताशाने एका गोंडस मुलाला जन्म दिला. त्याचे नाव अगस्त्य आहे. मुलाच्या जन्माच्या तीन वर्षानंतर २०२३मध्ये हार्दिक आणि नताशाने पुन्हा लग्नाचा निर्णय घेतला. दोघांनी आधी हिंदू परंपरेनुसार आणि त्यानंतर ख्रिश्चन रितिरिवाजानुसार लग्न केले.