पवार आणि ठाकरेंचा पक्ष प्रादेशिक तर आप ठरला राष्ट्रीय पक्ष
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय!
नवी दिल्ली : देशभरात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने (Election Commission) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (UBT) पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar NCP) पक्ष आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जोरदार झटका दिला आहे. या तिन्ही पक्षांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेण्यात आला असून त्यांच्या पक्षाला प्रादेशिक पक्षाचा (Regional Party) दर्जा दिला आहे. तर दुसरीकडे आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला आहे.
पुढील काही महिन्यात महाराष्ट्रसह हरियाणा आणि इतर राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे राहिलेल्या पक्षाला नाव आणि चिन्हासाठी लढा द्यावा लागला होता. त्यानंतर या पक्षांना चिन्ह मिळाले तर आता निवडणूक आयोगाकडून या पक्षांना राज्यस्तरीय पक्षाचा दर्जा देण्यात आला आहे. निवडणूक आयोगाकडून कोणत्याही पक्षाला निवडणूक आयोगाकडून कोणत्याही पक्षाला प्रादेशिक किंवा राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता देताना त्या पक्षाच्या लोकप्रतिनिधींना मिळालेल्या मतांची संख्या लक्षात घेतली जाते. यासाठी १९६८ च्या नियमांचा निकष ग्राह्य धरला जातो.