
मुंबई: भारताच्या श्रीलंका दौऱ्यासाठी संघाची घोषणा झाली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली वनडे संघाचा भाग आहेत. रोहित वनडे संघाचा कर्णधार असेल. तर सूर्यकुमार यादव टी-२० संघाचा कर्णधार असणार आहे. शुभमन गिल टी-२० आणि वनडे संघाचा उप कर्णधार असेल.
रियान पराग, शिवम दुबे, रिंकु सिंह यांना टीम इंडियामध्ये संधी देण्यात आली आहे. केएल राहुल आणि ऋषभ पंत यांचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. नव्या खेळाडूंबाबत बोलायचे झाल्यास हर्षित राणा या लिस्टमध्ये सामील आहे.
भारताच्या श्रीलंका दौऱ्यासाठी संघाची घोषणा
भारताचा टी-२० संघ - सूर्यकुमार यादव(कर्णधार), शुभमन गिल(उपकर्णधार), यशस्वी जायसवाल, रिंकु सिंह, रियान पराग, ऋषभ पंत, संजू सॅसमन, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षऱ पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंह, खलील अहमद, मोहम्मद सिराज.
भारताचा वनडे संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, केएल राहुल (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वाशिंगटन सुंदर, अर्शदीप सिंह, रियान पराग, अक्षर पटेल, खलील अहमद, हर्षित राणा.