दोन दिवसांपासून सुरु होता शोध
पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील आयएएस अधिकारी पूजा खेडकर (IAS Pooja Khedkar) वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. त्यातच त्यांची आई मनोरमा खेडकरने हातात पिस्तुल घेऊन शेतकऱ्यांना धमकावल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. याप्रकरणी पुणे पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला मात्र त्या फरार झाल्या होत्या. दोन दिवसांपासून पुणे पोलिसांनी खेडकर यांच्या पाथर्डी येथील घरावर व विविध ठिकाणी छापेमारी केली. आज अखेर पोलिसांनी मनोरमा खेडकरला महाड मधील हॉटेल मधून अटक केली आहे. स्थानिक पोलीस ठाण्यात नोंद करुन पोलीस त्यांना पुण्याला घेऊन येत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पूजा खेडकरची (IAS Pooja Khedkar) आई मनोरमा खेडकरला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केलं आहे. महाड मधून पूजा खेडकरच्या आईला पुणे ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलिसांची तीन पथके त्या ठिकाणी शोध घेत होती. पूजा खेडकरच्या बाणेर येथील बंगल्यावर जाऊन पोलिसांनी मनोरमा खेडकर असल्याची पाहणी केली होती. त्यावेळी तिने पोलिसांना दाद दिली नव्हती. नंतर घराच्या गेटवरती कुलूप लावल्याचं निर्दशनास आलं होतं. फोन देखील बंद असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर पोलिसांची ३ पथकं मनोरमा खेडकरसह इतरांचा शोध घेत होते. आज अखेर पुणे ग्रामीण पोलिसांनी मनोरमा खेडकरला अटक केली आहे.
अनेक दिवसांपासून मनोरमा खेडकरचा शोध पोलिसांकडून सुरू होता. खेडकरांच्या घराबाहेर नोटिस देखील लावण्यात आली होती. पुणे ग्रामीण पोलिसांचं पथक मनोरमा खेडकरला घेऊन पुण्याच्या दिशेने रवाना झालं आहे. महाडमधील एका हॉटेलमध्ये मनोरमा खेडकर लपून बसल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. त्यानंतर आज पहाटेच्या सुमारास पोलिसांचं पथक हॉटेलवरती दाखल झालं आणि तिला अटक करण्यात आली.
मुळशीतील व्हायरल व्हिडीओनंतर पूजा खेडकरांच्या आईवर गुन्हा दाखल
पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकरवर पौड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या अनुषंगाने पौड पोलिसांचं एक पथक बाणेर रस्त्यावर असलेल्या खेडकर यांच्या घराची पाहणी करून गेलं होतं. खेडकर कुटुंबाने कुठलाही प्रतिसाद न दिल्याने पोलीस निघून गेले होते. मनोरमा खेडकरने बंदुकीने शेतकऱ्यांना धमकावण्याचा व्हिडीओ समोर आला होता. त्यानंतर पौड पोलिसांनी मनोरमा खेडकरसह काही जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पौड पोलिस यासंदर्भात मनोरमा खेडकरची चौकशी करण्यासाठी आले होते. पण त्यांच्या घरी कुणीही नसल्याने पोलिस परत गेले. त्यानंतर मनोरमा खेडकर गायब झाल्याची माहिती समोर आली होती. आज तिला महाडमधून पुणे पोलिसांनी अटक केली आहे.