Friday, May 9, 2025

श्रध्दा-संस्कृतीसाप्ताहिक

कल्याणी किरकीसे सोलापूर यांना आलेला महाराजांचा अनुभव

कल्याणी किरकीसे सोलापूर यांना आलेला महाराजांचा अनुभव

गजानन महाराज - प्रवीण पांडे, अकोला


मला गजानन महाराजांच्या प्रचितीचे खूप अनुभव आले आहेत. माझ्या आई-वडिलांना तर अनेक अनुभव आले आहेत. माझी सर्व भावंडे आणि आम्ही सर्व मंडळी महाराजांचे भक्त आहोत. माझ्या वडिलांना महाराजांनी साक्षात दर्शन दिले आहे. १९८५ साली माझ्या वडिलांना ब्रेन हॅमरेज झाले होते व ते पुण्याला रुबी हॉस्पिटलला अ‍ॅडमिट होते. डॉक्टरांनी त्यांना “आपली तब्येत या दुखण्यातून बरी होऊ शकत नाही” असे सांगितले होते. आता जो काय भरावसा ठेवायचा तो देवावरच ठेवावा असे ठरवून त्यानुसार माझी आई त्यांच्या बाजूला बसून नामस्मरण करून महाराजांच्या पोथीचे पारायण करायची.


ज्या दिवशी वडील वारले त्या दिवशी त्यांना साक्षात्कार झाला. महाराज समोर दिसले त्यांना. ते माझ्या आईला म्हणाले, “तुला दिसलेत का महाराज?” आई म्हणाली “मला नाही दिसले.” वडिलांनी एका बाजूला बोट दाखविले आणि आईला म्हणाले, “बघ महाराज आलेत. नमस्कार कर.” ज्या दिशेला त्यांनी बोट दाखवलं त्या दिशेला माझ्या आईने नमस्कार केला. त्यानंतर माझे वडील लगेच वारले. त्यानंतर माझी आई शेगावला गेली. वडिलांच्या कपड्याचे गाठोडे सोबत घेऊन गेली होती. बरोबर तिथे ती मंदिरात नामस्मरण करत बसली असताना तिने समर्थांना सांगितलं की, “मला प्रचिती द्या की, माझ्या पतीस तुम्ही जवळ घेतलेले आहे.” तेव्हा त्या मंदिरात कुठून तरी एक कुत्रा आला आणि त्यांनी माझ्या वडिलांच्या गाठोड्यातले कपडे हुंगले व तो निघून गेला.


त्यानंतर माझ्या आईने महाराजांना नमस्कार केला व “याच्यापुढे माझी काही इच्छा राहिली नाही,” असे सांगितले. “तुम्ही सोबत आहात. तुम्ही सोबत राहा. कायम माझ्याजवळ राहा एवढे बोलून तिने महाराजांना नमस्कार घातला. त्यानंतर तो कुत्रा मंदिरात कुठेही तिला नंतर दिसला नाही.


माझ्या दोन्ही मुलींच्या वेळी मी महाराजांच्या पोथीची पारायण केली आणि त्यांनी मला खूप वेळा प्रचिती देऊन रक्षण
केले आहे.


माझ्या दोन्ही मुली एकदम छान आणि एज्युकेटेड आहेत. सगळी त्यांची कृपा आहे. आम्ही सर्वजण श्री महाराजांचे खूप खूप ऋणी आहोत आणि आमच्यावर महाराजांची कृपा अशीच राहो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना.

Comments
Add Comment