Monday, August 25, 2025

Ind vs Sl: भारत-श्रीलंका मालिका कधीपासून, किती वाजता रंगणार सामने, घ्या जाणून

Ind vs Sl: भारत-श्रीलंका मालिका कधीपासून, किती वाजता रंगणार सामने, घ्या जाणून

मुंबई: भारत आणि श्रीलंका यांच्यातील क्रिकेट मालिका २७ जुलैपासून सुरू होत आहे. मालिका सुरू होण्यास १० दिवसही उरलेले नाहीत मात्र अद्याप भारताकडून या मालिकेसाठी संघाची घोषणा करण्यात आलेली नाही. दुसरीकडे श्रीलंकेकडूनही या मालिकेसाठी संघाची घोषणा कऱण्यात आलेली नाही.

संभाव्य संघाबाबत बोलायचे झाल्यास सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्यासह विश्वकप जिंकून परतलेल्या खेळाडूंचे पुनरागमन शक्य आहे. सूर्यकुमार यादव अथवा हार्दिक पांड्या भारतीय टी-२० संघाचा कर्णधार असू शकतो. जाणून घेऊया कधीपासून सुरू होणार ही मालिका, सामन्यांची वेळ आणि बरंच काही...

भारत-श्रीलंका मालिका कधीपासून सुरू होत आहे?

भारत आणि श्रीलंका यांच्यातील द्विपक्षीय मालिकेची सुरूवात २७ जुलैपासून होत आहे. आधी टी-२० मालिका आणि नंतर वनडे मालिका खेळवली जाईल. तीन टी-२० सामने पल्लेकलमध्ये होतील. यानंतर कोलंबोमध्ये वनडे मालिका खेळवली जाईल.

भारत-श्रीलंका सामने किती वाजता सुरू होतील?

भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-२० सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता सुरू होतील. तर वनडे सामने दुपारी अडीच वाजता सुरू होतील.

गौतम गंभीरची नवी सुरूवात

भारत आणि श्रीलंका याच्या मालिकेद्वारे गौतम गंभीर नवी सुरूवात करत आहे. आधी खेळाडू म्हणून त्यानंतर आता प्रशिक्षक म्हणून तो या मालिकेतून नवी सुरूवात करत आहे. बीसीसीआयने गंभीरला २०२७ पर्यंत टीम इंडियाचा कोच बनवले आहे. गौतम गंभीरने राहुल द्रविडची जागा घेतली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा