Monday, May 12, 2025

महाराष्ट्रब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

Maharashtra Rain : मुंबईत मुसळधार पाऊस! पुढील तीन दिवस महत्त्वाचे

Maharashtra Rain : मुंबईत मुसळधार पाऊस! पुढील तीन दिवस महत्त्वाचे

'या' जिल्ह्यांना अलर्ट जारी


मुंबई : काल मुंबईत दिवसभर विश्रांती घेतलेल्या पावसाने रात्रीपासून मुंबईसह अनेक उपनगरात (Mumbai Rain) जोरदार हजेरी लावली. अशातच हवामान विभागाने (IMD) अतिवृष्टीचा (Heavy Rain Alert) इशारा देऊन अलर्ट जारी केला आहे. आज सकाळी ५.३० वाजे पर्यंत दक्षिण मुंबईत ५१.८ मिमी तर पश्चिम उपनगरात २७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पुढील तीन दिवस पावसाचा जोर असाच कायम राहणार असल्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी गरज असल्यास घराबाहेर पडा असे आवाहन केले आहे.


हवामान विभागानुसार, गुजरातच्या किनारपट्टीपासून ते केरळच्या किनारपट्टीपर्यंत हवेच्या कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे किनारपट्टीवर पावसाचा जोर राहणार आहे. त्यातच कोकण किनारपट्टी आणि विदर्भात पुढील तीन दिवस पावसाच्या सरी कोसळणार आहेत. तर रत्नागिरीत काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे हवामान विभागाकडून आज रत्नागिरीसाठी रेड अलर्ट तर, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे, रायगड, मुंबई, ठाणे, पालघरसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.



विदर्भात पावसाचा जोर वाढणार


बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने पूर्व विदर्भात पावसाचा जोर वाढणार आहे. यामुळे विदर्भ आणि विदर्भाला जोडून असलेल्या मराठवाड्यातील जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला असून उद्यापासून पूर्व विदर्भात आणखी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Comments
Add Comment