Saturday, August 31, 2024
Homeक्रीडाHardik Pandya: Fat To Fit, हार्दिक पांड्याचा असा होता प्रवास

Hardik Pandya: Fat To Fit, हार्दिक पांड्याचा असा होता प्रवास

मुंबई: हार्दिक पांड्याला भारताच्या टी-२० संघाचा पुढील कर्णधार मानले जात होते. २०२४च्या टी-२० वर्ल्डकपपर्यंत हार्दिकला पुढील कर्णधार बनवणे ठरलेले होते. टी-२० वर्ल्डकपमध्ये हार्दिकला उप कर्णधार म्हणून संघात सामीलही करण्यात आले होते. दरम्यान टी-२० वर्ल्डकपनंतर अनेक गोष्टी बदललेल्या आहेत.

सध्याच्या घडीला सूर्यकुमार यादवचे नाव कर्णधारपदासाठीच्या यादीत सर्वात वर दिस आहे. तर दुसरीकडे हार्दिक पांड्याच्या फिटनेसवरही सवाल केले जात आहे. मात्र हार्दिकने या फिटनेसवरून सवाल करणाऱ्यांना चोख उत्तर दिले आहे.

हार्दिकच्या करिअरमध्ये आतापर्यंत अनेकदा त्याला दुखापतींना सामोरे जावे लागले. यामुळे त्याला अनेक महिने क्रिकेटपासून दूर राहावे लागले. २०२३च्या वनडे वर्ल्डकपदरम्याही त्याला दुखापत झाली होती. त्यानंतर संघात परतण्यासाठी त्याला अनेक महिने लागले होते. हार्दिकच्या या खराब रेकॉर्डमुळे त्याला कर्णधारपदासाठी पहिली पसंती मिळत नाही आहे.

 

फिटनेसवर हार्दिक पांड्याने दिले चोख उत्तर

एकीकडे हार्दिक पांड्याच्या फिटनेसवर सवाल केले जा आहेत. यात सोशल मीडियावर त्याने आपले दोन फोटो शेअर केले आहेत. यात त्याने फिटनेसवर सवाल करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. हार्दिकने सांगितले की २०२३ वनडे वर्ल्डकपनंतर त्याच्यासाठी पुनरागमन करण्याचा प्रवास सोपा नव्हता. हार्दिकने सोशल मीडियावर दोन फोटो शेअर केले आहेत. यात एका फोटोत हार्दिक अनफिट दिसत आहे. हार्दिकचे पोट बाहेर आलेले दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत हार्दिकची बॉडी फिट दिसत आहे.

या फोटोंना कॅप्शन देत हार्दिकने लिहिले, वनडे वर्ल्डकप २०२३च्या गंभीर दुखापतीनंतरचा प्रवास खूप कठीण होता. मात्र टी-२० वर्ल्डकप विजयामुळे हा प्रयत्न यशस्वी ठरला. जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करता त्याचा रिझल्ट नक्की येतो. केलेले कष्ट कधीच वाया जात नाहीत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -