Monday, August 4, 2025

Hardik Natasa Divorce: हार्दिक पांड्या-नताशाचा घटस्फोट, सोशल मीडियावर पोस्ट केली शेअर

Hardik Natasa Divorce: हार्दिक पांड्या-नताशाचा घटस्फोट, सोशल मीडियावर पोस्ट केली शेअर

मुंबई: टीम इंडियाचा ऑलराऊंडर खेळाडू हार्दिक पांड्याची पत्नी नताशा स्टेनकोविकशी घटस्फोट झाला आहे. नताशाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याची माहिती दिली आहे. नताशाने सोशल मिडिया पोस्टमध्ये लिहिले की ते दोघेही एकमेकांच्या सहमतीने वेगळे झाले आहेत.


हार्दिक आणि नताशाने २०२०मध्ये लग्न केले होते. मात्र लग्नाच्या ४ वर्षानंतर ते आता वेगळे झाले आहेत. नताशाने घटस्फोटाच्या पोस्टमध्ये अगस्त्याबद्दलही लिहिले आहे.


नताशाने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. त्यात लिहिले, तब्बल ४ वर्षांनी मी आणि हार्दिक एकमेकांच्या सहमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही दोघांनी एकत्र राहून सर्वश्रेष्ठ दिले. मात्र आता दोघांनी हा निर्णय घेतला. हा आमच्यासाठी खूप कठीण निर्णय आहे. अगस्त्य आमच्या दोघांच्या जीवनाचा भाग आहे. आम्ही दोघेही त्याला सर्व आनंद देण्याचा प्रयत्न करू.


 



 










View this post on Instagram























 

A post shared by @natasastankovic__





हार्दिक आणि नताशाने एकच पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. या दोघांनी २०२०मध्ये लग्न केले होते. पांड्या आणि नताशा यांच्या घटस्फोटाच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होत्या. मात्र आता दोघांनी यावर शिक्कामोर्तब केले आहे. पांड्या आणि नताशाने ३१ मे २०२०मध्ये लग्न केले होते. याचवर्षी त्यांचा मुलगा अगस्त्यचा जन्म झाला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा