Monday, April 21, 2025
Homeसाप्ताहिकश्रध्दा-संस्कृतीयुरोपियन अधिकाऱ्यावर कृपा

युरोपियन अधिकाऱ्यावर कृपा

समर्थ कृपा – विलास खानोलकर

श्री सॉलोमन नावाचा रेल्वेतील सोलापूरमधील एक कडक स्वभावाचा युरोपियन अधिकारी श्री स्वामी समर्थांची कीर्ती ऐकून, त्यास संतती व्हावी म्हणून श्री स्वामी समर्थांच्या दर्शनास अक्कलकोटला आला. श्री स्वामींचे दर्शन घेऊन ‘संतान हवे’ असे मनोमन चिंतन करीत, श्री स्वामींच्या पुढे उभा राहिला. त्याच्या तोंडाकडे श्री स्वामींनी त्याला आशीर्वाद दिला. याचे त्या युरोपियन अधिकाऱ्यास मोठे आश्चर्यच वाटले आणि त्यास आनंदही झाला. पुढे एका वर्षाच्या आतच त्याला मुलगा झाला.

भावार्थ : श्री स्वामी समर्थांच्या कृपाशीर्वादाने अनेकांना पुत्रसंतान प्राप्ती झाल्याच्या नवलकथा रेल्वेतील त्या युरोपियन अधिकाऱ्याने ऐकल्या होत्या. त्यामुळे त्याला श्री स्वामी समर्थांबद्दल प्रचंड कुतूहल तर होतेच, शिवाय पुत्रप्राप्तीचा कृपाशीर्वाद मिळावा; हा अंतस्थ हेतूही होता म्हणून तो श्री स्वामी दर्शनास अक्कलकोटला आला. श्री स्वामींचे दर्शन घेऊन, तो उभा राहताच, श्री स्वामींनी त्याच्या मनातल्या अंतःस्थ हेतू जाणला. ‘क्या तेरेकू बेटा होना, हो जायेगा, एक बरस दिन’ असा कृपाशीर्वादही देऊन टाकला.

या लीलेत त्या युरोपियन अधिकाऱ्याच्या मनातील श्रद्धेला श्री स्वामी समर्थांसारख्या अलौकिक दैवी दर्शनाने धुमारा फुटला, त्यांच्यातला उरला-सुरला प्रपंचिक जडवाद नाहीसा झाला. श्री स्वामींनी त्याच्या मनातील ‘पुत्र-संतान’ प्रप्तीचा हेतू ओळखून, त्याला तसा कृपाशीर्वाद दिल्यामुळे, त्याची श्री स्वामी समर्थांवरील श्रद्धा अधिकच दृढ झाली. वर्षभरातच त्याच्या श्रद्धेला फळ येऊन, त्याला पुत्र झाला. त्या दृष्टीने त्याचा श्री स्वामींना एक प्रकारे उद्धारच केला व दिलेल्या कृपाशीर्वादाचा त्यास प्रत्यय दिला. पुढे त्याची श्री स्वामींवरील श्रद्धा इतकी वाढीस लागली की, तो स्वतः सहकुटुंब श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाला पुन:पुन्हा अक्कलकोटला येत राहिला. शिवाय त्याने अनेक युरोपियनांना श्री स्वामी समर्थांची दैवी महिमा सांगितला. श्री स्वामी जात-पात-धर्म-पंथ-गरीब-श्रीमंत-विद्वान-अडाणी असा कोणताही भेदभाव न करता, कशी कृपा करीत, हा प्रमुख बोध या लीलेतून मिळतो.

स्वामीकृपे विदेशीला सुपुत्र

सोलोमन नामे अधिकारी गोरा
निपुत्रिक नामे झाले गोरा-मोरा ।। १।।
स्वामी चरणी आला धावून
विनवी! स्वामी! गरीबसेवा घ्या पावून ।। २।।
मझं हवा श्रीकृष्णासारखा बालक
येशूख्रिस्त होईल त्याचा पालक ।। ३।।
पण तुम्ही साऱ्या जगाचेच मालक
आम्ही शरण तुम्ही विश्व मालक ।। ४।।
वाहतो तव चरणी फुले, नारळ
मार्ग सांगावा तुम्ही स्वामी सरळ ।। ५।।
सांगाल तो फेडीन नवस
जीवनातील घालवा काळा अवस ।। ६।।
१०१ सोने रुपये वाहीन मोहरा
१०१ ब्राह्मण जेवणास सोवळा ।। ७।।
बोलवा १०१ बालक कोवळा
पंचा दान रुपया आंबा, कोहळा ।। ८।।
स्वामी ओळखी मनातला भाव
समझले प्रेमरूपी हृदयातला भाव ।। ९।।
युरोपियन भक्तास दिले अभय
वर्षभरात होईल पुत्र नाम विजय ।। १०।।
स्वामी कृपेने वर्षभरात झाला गोरापुत्र
जन्म होताच स्वामीचरणी वाहिला सुपुत्र ।। ११।।
स्वामी आनंदुनी दिला विश्वास
भक्त म्हणे विश्वाचा तुम्हावर विश्वास ।। १२।।
तुम्हा मुळेच घेतो दिनरात श्वास
तुम्हीच दूर करता गळ्याचा फास ।। १३।।
गेले असे अनेक वर्षे मास
अनेक युरोपियन आले चरणी खास ।। १४।।
कीर्ती गेली स्वामींची जगभर
स्वामींची मंदिरे झाली जगभर ।। १५।।
अनेक निपुत्रिकास स्वामीकृपे पुत्र
सुखी संसाराचे स्वामीनाम सुत्र ।। १६।।
आनंदे, हसत, रमत, जगावे
बालकांच्या चेहऱ्यावर हास्य खुलावे ।। १७।।
गरिबास द्यावे श्रीमंतीचा आशीर्वाद
श्रीमंतास गरिबावर कृपेचा संवाद ।। १८।।
सर्व भक्त आनंदी जगभर
स्वामी कृपा जाई पुरी विश्वभर ।। १९।।
भिऊ नको पाठीशी खरा तो मंत्र
हम गया नही! हाच खरा मंत्र ।। २०।।
गरिबास मदत, अपंगास काठी
संकटावर स्वामी मारीत लाठी ।। २१।।
ठेवा श्रद्धा देवावर सबुरी
स्वामी संकटला देती धुरी ।। २२।।

[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -