Monday, April 21, 2025
Homeताज्या घडामोडीअखेर मोकाट गुरांच्या शिंगांना चिकटवले रेडियम!

अखेर मोकाट गुरांच्या शिंगांना चिकटवले रेडियम!

तळा : तळा शहरातील रस्त्यांवर बसणाऱ्या मोकाट गुरांमुळे (Cattle) अपघाताचे प्रमाण वाढले असून, याबाबत प्रसारमाध्यमांमधून बातम्या झळकल्यानंतर खडबडून जागे झालेल्या तळा नगरपंचायत प्रशासनाने आपल्या कर्मचाऱ्यांमार्फत मोकाट गुरांच्या शिंगांना (Cattle Horns) रेडियम (Radium) चिटकवले. ज्यामुळे रात्रीच्या वेळी या रेडिममुळे होणारा अपघात टाळण्यास मदत होणार आहे.

तळा शहरातील रस्त्यांवर रात्रीच्या वेळी अनेक भागात उनाड गुरांचे बसण्याचे प्रमाण अधिक असल्याने, रात्रीच्या वेळी वाहन चालक अथवा प्रवासी रस्त्यावरून जात असताना अपघात होण्याचा धोका अधिक आहे. तसेच काही वेळा मोटरसायकलवाले पडल्याच्या घटनाही घडल्या. या घटना घडू नयेत, यासाठी उनाड गुरांच्या शिंगांना नगरपंचायतीच्या माध्यमातून रेडियमच्या पट्ट्या चिकटविण्यात येतात. अशा पट्ट्या अनेक गुरांच्या शिंगांना चिकटवल्याने, रात्रीच्या वेळी मोटरसायकलस्वाराला व वाहन चालकाला या गुरांच्या शिंगांना चिकटवलेल्या पट्ट्या चमकताना दिसतात व त्यावेळी वाहनचालकांच्या लक्षात येते की, येथे काही तरी आहे.

वाहनांचा वेग कमी करून, समोर असणारी गुरे आहेत, हे लक्षात येऊन, होणारा अपघात टळतो. मात्र अशी उनाड गुरे ज्या मालकांची आहेत, त्यांनी असे अपघात अथवा धोके होऊ नयेत, यासाठी आपल्या गोठ्यात बांधून ठेवावीत, अशीही अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -