Wednesday, May 21, 2025

विदेशमहत्वाची बातमी

China: चीनमध्ये शॉपिंग मॉलला भीषण आग, १६ जणांचा होरपळून मृत्यू

China: चीनमध्ये शॉपिंग मॉलला भीषण आग, १६ जणांचा होरपळून मृत्यू

मुंबई: चीनमध्ये बुधवारी एक मोठी दुर्घटना घडली. चीनच्या दक्षिण पश्चिम शहराच्या जिगोंगमध्ये एका शॉपिंग मॉलला मोठी आग लागली. यात १६ जणांचा होरपळून मृत्यू झाला. चीनच्या सरकारी मीडियाच्या बातमीनुसार सिचुआन प्रांतातील जिगोंग शहरात १४ मजली बिल्डिंग आगीच्या विळख्यात सापडली.


यामुळे अनेकजण या बिल्डिंगमध्ये अडकून पडले. घटनेचा व्हिडिओही समोर आला यात इमारतीतून काळा धूर निघत आहे.


आग लागल्याची सूचना मिळताच ३०० इमर्जन्सी वर्कर्स आणि अनेक अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. इमर्जन्सी वर्कर्सनाी रेस्क्यू ऑपरेशन करत ३० जणांना या बिल्डिंगमधून वाचवले.


स्थानिक अधिकाऱ्यांच्या हवाल्याने मिळालेल्या माहितीनुसार सुरूवातीच्या तपासाअंती हे समोर आले आहे की आग लागण्याचे कारण कन्स्ट्रक्शनचे काम होते. याचमुळे तेथे ठिणगी उडाली आणि आग लागली. दरम्यान, अद्याप याबाबतचे अधिकृत विधान समोर आलेले नाही.

Comments
Add Comment