Saturday, August 31, 2024
HomeदेशChandipura Virus : चांदीपुरा व्हायरसचे थैमान! २७ लोकांना प्रादुर्भाव; १५ जणांचा मृत्यू

Chandipura Virus : चांदीपुरा व्हायरसचे थैमान! २७ लोकांना प्रादुर्भाव; १५ जणांचा मृत्यू

गांधीनगर : काही दिवसांपूर्वी गुजरातमध्ये (Gujarat) चांदीपुरा नावाच्या व्हायरसने (Chandipura Virus) एन्ट्री केल्याची माहिती मिळत होती. यामुळे सहा जणांना व्हायरसचा प्रादुर्भाव झाला असून चौघांचा मृत्यूही झाला होता. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. या प्रकरणानंतर गुजरातमध्ये चांदीपुराचे थैमान आणखी वाढले असल्याचे चित्र दिसून येत आहे. सध्या विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्येत वाढ झाली असून ती २७ वर पोहोचली आहे. सातत्याने वाढत चाललेल्या चांदीपुराचा कहर पाहून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातमधील साबरकांठा जिल्ह्यातील ग्रामीण भागात चांदीपुरा विषाणूमुळे संसर्गाचे वातावरण निर्माण झाले आहे. साबरकांठा आणि अरावलीमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. रुग्णांमधील २७ प्रकरणांपैकी २४ गुजरात तर ३ रुग्ण इतर राज्यातून गुजरातमध्ये आली असल्याची माहिती मिळत आहे. मृतांमध्ये आठ लहान मुलांचा समावेश आहे. याबाबत आरोग्य यंत्रणा (Health Department) सतर्क झाली असून गुजरातमध्ये ८५०० हून अधिक घरे आणि ४७ हजारांहून अधिक लोकांचे स्क्रीनिंग करण्यात आले आहे.

दरम्यान, राज्यातील इतर १२ जिल्ह्यांमध्ये संशयास्पद प्रकरणे समोर आली आहेत. व्हायरसच्या वाढत्या केसेस लक्षात घेऊन गुजरातचे आरोग्य मंत्री आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंग करणार आहेत.

ही आहेत लक्षणे

‘चांदीपुरा’ व्हायरसची लागण झालेल्यांना ताप येतो, ज्याची लक्षणे फ्लूसारखी असतात. यामुळे गंभीर एन्सेफलायटीस (मेंदूची जळजळ) होते. त्यासोबत मेंदूला सूज येणे अशी अनेक लक्षणे दिसू लागतात. हा विषाणू डास, वाळू माशी आणि कीटकांद्वारे पसरते.

असा करा बचाव

या विषाणूपासून संरक्षण करण्याचे उपाय मलेरियापासून बचाव करण्यासारखे आहेत. जसे घरामध्ये आणि आजूबाजूला स्वच्छता राखणे, डास किंवा माश्या यांच्या संपर्कात येऊ नये आणि झोपताना मच्छरदानीचा वापर करणे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -