Saturday, August 31, 2024
Homeताज्या घडामोडीVishalgad Encroachment : हिंसाचाराच्या मुद्द्यावर आज अजित पवार पोहोचणार विशाळगडावर!

Vishalgad Encroachment : हिंसाचाराच्या मुद्द्यावर आज अजित पवार पोहोचणार विशाळगडावर!

दंगलीला कारणीभूत फरार आरोपी बंडा साळोखे आणि रवींद्र पडवळ यांचाही शोध सुरु

कोल्हापूर : संभाजी राजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी विशाळगडावरील अतिक्रमण हटवा मोहिमेसाठी आक्रमक पवित्रा घेतला व १४ जुलै रोजी विशाळगडाकडे (Vishalgad) शेकडो कार्यकर्त्यांसह रवाना झाले. मात्र, या मोहिमेला हिंसक वळण लागलं. विशाळगडावरील स्थानिकांवर हल्ला झाल्याचा प्रकार घडला. इतकंच नव्हे तर बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांवर सुद्धा हल्ला करण्यात आला. विशाळगड परिसरातील वाहनांची तसेच घरांची तोडफोड करण्यात आली. गेल्या चार दिवसांपासून विशाळगडचा मुद्दा तापला असतानाच आता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे आज संध्याकाळी विशाळगडावर पोहोचणार आहेत. विशाळगड परिसरातील हिंसाचारग्रस्त भागाची पाहणी करून ते पीडितांशी संवाद साधणार आहेत.

तत्पूर्वी १४ जुलै रोजी छत्रपती संभाजी राजे यांनी विशाळगड अतिक्रमण मुक्तीसाठी हाक दिली होती. कोणत्याही परिस्थितीत आंदोलन करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. मात्र, संभाजीराजे हे समर्थकांसह गडावर पोहोचण्यापूर्वीच रवींद्र पडवळांच्या चिथावणीनंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड प्रमाणात गजापुरात हिंसा केली होती. रवींद्र पडवळसह कोल्हापुरातील बंडा साळोखे यांच्यावर ही जमावाला भडकवण्याचा आरोप आहे. दंगलीनंतर फरार झालेल्या त्यांच्या शोधासाठी पथके सुद्धा रवाना करण्यात आली आहेत.

संशयितांच्या अटकेसाठी आठ पथके तैनात करण्यात आली आहेत. काही पथके रवींद्र पडवळ यांच्या मागावर पुणे जिल्ह्यात आहेत. मात्र, पडवळ हे मोबाइल बंद करून गायब आहेत, अशी माहिती समोर आली आहे. बंडा साळोखे आणि त्यांच्या साथीदारांवरही अटकेची कारवाई होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

बंडा साळोखे, रवींद्र पडवळ दंगलीला कारणीभूत

संभाजीराजे छत्रपती समर्थकांसह विशाळगडाच्या पायथ्याला पोहोचण्यापूर्वीच हिंदू बांधव समिती आणि सेवाव्रत प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी गडाच्या पायथ्याला प्रचंड तोडफोड केली होती. जमावबंदी लागू असल्याने आंदोलन करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले होते. त्याकडे दुर्लक्ष करून तोडफोड करण्यात आली होती. दुसरीकडे, कोल्हापुरातील सेवाव्रत संघटनेचे बंडा साळोखे यांनी शनिवारी रात्री सोशल मीडियात व्हिडिओ व्हायरल करून कार्यकर्त्यांना गडावर येण्याचे आवाहन केले होते. त्यांनीच गडावरील आणि पायथ्याच्या तोडफोडीसाठी चिथावणी दिल्याचे काही व्हिडिओतून समोर येत आहे. त्यामुळे पोलिसांनी पडवळ आणि साळोखे यांच्यावर दंगलीला कारणीभूत ठरल्याचे गुन्हे दाखल केले आहेत. याशिवाय प्रत्यक्ष घरांची तोडफोड करणाऱ्यांवर दरोड्याचे गुन्हे दाखल केले आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -