Thursday, January 15, 2026

खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून सहा वर्षीय बालकाचा मृत्यू!

खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून सहा वर्षीय बालकाचा मृत्यू!

महिन्याभरातील दुसरी घटना

भाईंदर : चार दिवसांपूर्वी आपल्या आजीकडे उत्तनच्या येडू कंपाऊंड येथे राहण्यास आलेल्या सहा वर्षीय किरणचा पावसाच्या पाण्याने साचलेल्या खड्डयात बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. या पावसाळ्यात खड्ड्यात पडून मृत्यू झाल्याची शहरातील दुसरी घटना आहे.

काशीमीरा भागात राहणारा किरण हर्षद कॉलर हा सहा वर्षीय मुलगा आपल्या आईसोबत उत्तन येथील येडू कंपाऊंडमध्ये राहण्यास आला होता. बुधवारी सकाळी खेळायला बाहेर गेला. किरण बराच वेळ दिसत नसल्यामुळे, त्याची आई शोध घेत असताना, घराजवळील एका डबक्याजवळ त्याची चप्पल पडल्याचे दिसली. त्यामुळे तो पाण्यात बुडाल्याचा संशय आल्याने, याची माहिती कुटुंबीयांनी अग्निशमन विभागाला दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी डबक्यात शोध घेतला असता, त्यात किरणचा मृतदेह आढळून आला. उत्तन पोलिसांनी पंचनामा करून, मृतदेह शवविच्छेदनासाठी भाईंदरच्या भीमसेन जोशी रुग्णालयात पाठवला असल्याची माहिती उत्तन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादाराम कारंडे यांनी दिली.

Comments
Add Comment