
मुंबई : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये (Mukhyamantri Ladaki Bahin Yojana) १५ दिवसांत तब्बल ४४ लाख महिलांनी ऑनलाइन पद्धतीने (online) अर्ज (applications) केले आहेत. तर ऑफलाइन पद्धतीने अर्ज केलेल्या महिलांचा आकडा लवकरच समोर येईल, अशी माहिती राज्याच्या महिला आणि बालकल्याण विभागाचे सचिव अनुप कुमार यादव यांनी दिली. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जाणार आहेत.
एक जुलै २०२४ पासून या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. तर ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत या योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत असणार आहे. या योजनेसाठी राज्य सरकार दरवर्षी तब्बल ४६ हजार कोटी रुपये खर्च करणार आहे.
या योजनेचा २१ ते ६५ वयोगटातील महिला लाभ घेऊ शकणार आहेत. ही योजना गरीब महिलांसाठी असणार असून, पिवळं आणि केशरी रेशनकार्ड धारकांना याचा लाभ होणार आहे. ३.५० कोटी महिलांना फायदा होण्याची आशा आहे. दरम्यान, लाभार्थीचे वर्षाला उत्पन्न २ लाख ५० हजार रुपयांपेक्षा कमी असावे, अशी अट आहे.