मुंबई: क्रिकेटमध्ये कधी काय होईल कोणीच याबाबत सांगू शकत नाही. तसेच म्हटलेच जाते की क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे त्यामुळे काय होईल काहीच सांगता येत नाही. असेच काहीसे चित्र युरोपियन टी१० लीगमध्ये पाहायला मिळाले. या लीगमध्ये एक सामना असा झाला की त्यावर विश्वास ठेवणे कठीणच आहे.
तुम्ही कधी विचार केला का की एखाद्या संघाला विजयासाठी शेवटच्या १२ बॉलमध्ये ६१ धावा हव्या आहेत आणि तो संघ एक चेंडू राखून हे आव्हान पूर्णही करतो. तुम्ही म्हणाल कसे शक्य आहे. मात्र हे घडले आहे. हो…खरंच. युरोपियन लीगमध्ये एका संघाला विजयासाठी शेवटच्या १२ बॉलमध्ये ६१ धावा हव्या होत्या आणि त्या संघाने एक चेंडू राखत हे आव्हान पूर्णही केले. या संघाच्या विजयाची टक्केवारी केवळ एक टक्के होती मात्र त्या संघाने बाजी पलटून लावली आणि हरलेला सामना जिंकला.
Austria chase 6️⃣1️⃣ runs in last 2 overs! 🤯#EuropeanCricket #EuropeanCricketInternational #StrongerTogether pic.twitter.com/Y8bLptmT56
— European Cricket (@EuropeanCricket) July 15, 2024
हा सामना ऑस्ट्रिया आणि रोमानिया यांच्यात खेळवण्यात आला होता. रोमानियाने पहिल्यांदा फलंदाजी करताना १० षटकांत १६८ धावांचे मोठे आव्हान दिले होते. रोमानियासाठी विकेटकीपर फलंदाज अरियान मोहम्मदने नाबाद १०४ धावांची शानदार खेळी केली. यानंतर या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रियाची धावसंख्या ८ षटकांत केवळ १०७ इतकी झाली होती. ऑस्ट्रियाला शेवटच्या २ षटकांत जिंकण्यासाठी ६१ धावांची गरज होती. विजयाची शक्यता केवळ एक टक्के इतकी होती. कारण प्रत्येक ओव्हरमध्ये ३०.५ धावा हव्या होत्या.
ऑस्ट्रियाने ९व्या षटकांत ४१ धावा केल्या., यात ९ धावा या एक्स्ट्रा आल्या बाकी सर्व धावा बाऊंड्रीने आल्या. आता शेवटच्या षटकांत २० धावा करायच्या होत्या. या धावा ऑस्ट्रियाने केवळ पाच धावांत केल्या आणि एक बॉल राखत विजय मिळवला.