सातारा : काही दिवसांपूर्वी मराठवाड्यासह विदर्भात (Marathwada vidarbha) सकाळी भूकंपाचे (Earthquake) सौम्य धक्के बसले होते. यामुळे संपूर्ण मराठवाडा हादरून गेला होता. हे प्रकरण ताजे असतानाच आता साताऱ्यातील कोयना (Koyna) नगर परिसरातही भूकंपाचे धक्के बसल्याची माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी ३.२६ वाजेच्या सुमारास भूकंपाचा धक्का बसला. २.८ रिश्टर स्केल तीव्रतेचा हा भूकंप होता. भूकंपाचा हा सौम्य धक्का असला तरीही नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.