मुंबई: भारतीय संघाची पुढील मालिका श्रीलंकेविरुद्ध रंगत आहे. या दौऱ्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात घेतला जात आहे. श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियासाठी नियमित टी-२० कर्णधाराचा शोध घेतला जात आहे. ३ सामन्यांची टी-२० मालिका आणि तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जात आहे. या मालिकेआधी टीम इंडियाच्या टी-२० कर्णधारपदाची चर्चा जोरदार सुरू आहे.
याआधी हार्दिक पांड्याला टी-२०चे कर्णधारपद मिळू शकते असे म्हटले जात होते. कारण रोहित शर्माच्या नेतृत्वात त्याच्याकडे उपकर्णधारपद ोते. त्यामुळे पुढील कर्णधार तोच असेल असे बोलले जात होते. मात्र आता समोर आलेला रिपोर्ट आश्चर्यजनक आहे. यात हार्दिक नव्हे तर सूर्यकुमार यादव पुढील टी-२० कर्णधार असू शकतो.
सूर्यकुमार यादवने २०२३वनडे वर्ल्डकपनंतर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळवलेल्या टी-२० मालिकेत भारताचे नेतृत्व केले होते. दोन्ही मालिकेनंतर सूर्याला चांगला फीडबॅक मिळाला होता.
रोहित शर्मा तीनही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व सांभाळत होता. मात्र २०२४च्या टी-२० वर्ल्डकपचा खिताब जिंकल्यानंतर रोहितने टी-२० मधून निवृत्ती जाहीर केली. अशात टी-२० कर्णधाकपदाचा शोध