मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी सांगितले की लाडकी बहीण योजनेचे पैसे पुढील महिन्यात रक्षाबंधनाच्या सणादरम्यान दिले जाणार आहेत. रक्षाबंधनाचा सण १९ ऑगस्टला साजरा होत आहे. त्यावेळेस या योजनेचा पहिला हफ्ता दिला जाणार आहे.
काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थ मंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह देवेंद्र फडणवीस गडचिरोली जिल्ह्यात एका कार्यक्रमानिमित्त गेले होते. यावेळी त्यांनी या योजनेच्या मानधनाबद्दल माहिती दिली.
३१ ऑगस्टपर्यंत जमा करू शकता फॉर्म
गडचिरोलीमधील कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाला माहिती दिली की आम्ही १५ ऑगस्ट ते १९ ऑगस्टपर्यंत रक्षाबंधन सणादरम्यान लाडकी बहीण योजनेचा पहिला हफ्ता जारी करण्याच्या दिशेने काम करत आहोत. ३१ ऑगस्टपर्यंत फॉर्म जमा करणाऱ्या अर्जदारांना पुढील महिन्यात जुलै आणि ऑगस्टचे पैसे मिळतील.
देवेंद्र फडणवीस यांनी हे ही सांगितले की ही आर्थिक सहाय्य योजनेसाठी नाव दाखल करण्याची शेवटची तारीख १५ जुलैहून वाढवण्यात आली आहे. विरोधी पक्षांकडून मागणी करण्याआधी याचे फॉर्म जमा करण्याची शेवटची तारीक वाढवली होती. कारण अंगणवाडी, ग्रामपंचायत केंद्र आणि सरकारी कार्यालयांमध्ये यासाठी महिलांची गर्दी वाढली होती.
काय आहे ही योजना
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत २१ ते ६५ वर्षापर्यंतच्या विवाहित, घटस्फोटित आणि गरजू महिलांना दर महिन्याला १५०० रूपये मिळणार. दरम्यान, लार्भार्थ्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न २.५ लाखापर्यंत असायला हवे.