Monday, April 21, 2025
Homeताज्या घडामोडीKalki AD'2898 : बॉक्स ऑफिसवर कल्की एडी २८९८ चा जोर!

Kalki AD’2898 : बॉक्स ऑफिसवर कल्की एडी २८९८ चा जोर!

२० दिवसांत तब्बल ५८८ कोटींची कमाई

मुंबई : नाग अश्विन दिग्दर्शित ‘कल्की २८९८ एडी’ (Kalki AD’2898) या चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावले आहे. कलियुगाचा भविष्यात होणारा अंत आणि त्यासाठी वाचवायला जन्म घेणाऱ्या कल्कीची कथा यात मांडण्यात आली आहे. अमिताभ बच्चन, कमल हासन, दीपिका पदुकोण आणि प्रभास (Prabhas) या दिग्गज कलाकारांनी चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या आहेत. २७ जून रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवसापासून बॉक्स ऑफिसवर (Box Office) धुमाकूळ घातला आहे. तर हा धुमाकूळ अजूनही कायम असाच असल्याचे चित्र दिसून येत आहे. अवघ्या २० दिवसांत या चित्रपटाने तब्बल ६०० कोटींचा टप्पा गाठला आहे. हा टप्पा आणखी पुढे जाईल अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

२० दिवसांत ५८८ कोटींची कमाई

या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात ४१४.८५ कोटींची कमाई केली होती. दुसऱ्या आठवड्यात ‘कल्की 2898 एडी’चे कलेक्शन १२८.५ कोटी होते. रिलीजच्या तिसऱ्या आठवड्यातही चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. तर आता या चित्रपटाचे ४.२५ कोटींची कमाई केली असल्याची माहिती मिळत आहे.

जवान चित्रपटाला मागे टाकणार?

‘KGF २’ने ८५९.७ कोटी, RRR ने ७८२.२ कोटी, ‘जवान’ने ६४०.२५ तर ‘बाहुबली २’ने १०३०.४२ कोटींची कमाई केली आहे. त्यादरम्यान ‘कल्की २८९८ एडी’ने कमाईच्या बाबतीत ‘जवान’ला मागे टाकण्यासाठी अजून ६० कोटी रुपये कमवावे लागणार आहे.

दरम्यान, विकी कौशलचा ‘बॅड न्यूज’ हा चित्रपट १९ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट काहीसा वेगळ्या जॉनरचा असल्याने ‘कल्की’ला आता तिकिटबारीवर किती आव्हान मिळेल, हे रिलीजनंतरच स्पष्ट होणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -