मुंबई: वास्तुशास्त्रानुसार सकाळी उठल्यानंतर काही कामे करणे अशुभ मानले जाते. तसेच काही गोष्टी पाहूही नयेत. असे करणे चुकीचे मानले जाते. जर सकाळी उठून सातत्याने तुम्ही या गोष्टी पाहत असाल तर यामुळे तुमच्यावर आर्थिक संकट येऊ शकते.
वास्तुशास्त्रानुसार कोणीही सकाळी उठून आपली अथवा दुसऱ्या कोणाची सावली पाहू नये. हे अशुभ मानले जाते. सकाळच्या वेळेस सूर्यदर्शनाच्या वेळेस जर तुम्ही चुकूनही आपली सावली पश्चिम दिशेला पाहिली तर ते अशुभ मानले जाते.
सकाळी उठल्यावर कधीही रात्रीची उष्टी भांडी पाहू नयेत. असे केल्याने घरात धन-दौलत येणे कठीण होते. या चुकीपासून बचाव करण्यासाठी रात्रीच्या वेळेस उष्टी खरकटी भांडी साफ करून ठेवा.
वास्तुशास्त्रानुसार कोणत्याही व्यक्ती सकाळी झोपून उठल्यावर सगळ्यात आधी आरसा पाहू नये. वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही असे करत असाल तर रात्रीची सर्व नकारात्मकता आरशातून तुम्हाला मिळू शकते.
सकाळी उठल्यावर हिंस्र प्राणी अथवा जंगली प्राण्याचे पेंटिंग पाहू नये. असे पेंटिंग बेडरूममध्ये लावल्यास ती काढून ठेवावी.