
मुंबई : महाराष्ट्रातील शिवप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी लंडन (London) येथील असलेली बहुप्रतिक्षित वाघनखांबाबत (Waghnakhe) चर्चेचे उधाण पसरले होते. विरोधकांकडून ही वाघनखे शिवरायांची नसल्याचा आरोप केला जात होता. त्यावर सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी ही वाघनखे शिवरायांचीच असल्याचा दावा केला होता. त्यानंतर ही वाघनखे लवकरच महाराष्ट्रात येतील अशी घोषणाही त्यांनी केली होती. दरम्यान आता लवकरच लंडनमधील वाघनखांचे महाराष्ट्रात (Maharashtra) आगमन होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराज यांची लंडनमधील व्हिक्टोरीया अँड अल्बर्ड म्युझियमध्ये खासगी सुरक्षेत ठेवलेली वाघनखे उद्या महाराष्ट्रात आणली जाणार आहेत. त्यानंतर सायंकाळी ती सातारा येथे नेली जाणार आहेत. विशेष विमानातून वाघनखे साताऱ्यात दाखल होणार असून राज्य सरकारच्या वतीने १९ जुलै रोजी या वाघनखांबाबत साताऱ्यात भव्यदिव्य सोहळ्याचे आयोजन देखील करण्यात आले आहे.
वाघनखे ठेवण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च
महाराष्ट्रात आणल्या जाणाऱ्या वाघनखांसोबत छत्रपती शिवरायांच्या इतर शस्त्रांचे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. त्यामुळे साताऱ्यामधील म्युझियमच्या डागडुजीसाठी आणि नुतनीकरणासाठी १४ लाख ८ हजार रुपयांचा खर्च झाला करण्यात आला आहे.