Thursday, August 29, 2024
Homeताज्या घडामोडीअखेर नवी मुंबईच्या धावपट्टीवरुन उडाले विमान

अखेर नवी मुंबईच्या धावपट्टीवरुन उडाले विमान

पाच टप्प्यात उभारले जाणार विमानतळ

नवी मुंबई : राज्यातील बहूचर्चित नवी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवरून विमान उडताना आणि उतरताना कोणता अडथळा तर येत नाही ना, हे पाहण्यासाठी बुधवारी पहिल्यांदाच भारतीय विमानतळ प्राधिकरणाने सिग्नलसह विमानांची चाचणी घेतली. भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे विशेष विमान नवी मुंबई विमानतळावरून उडणार असल्याचे समजताच परिसरात बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. या चाचणीचा अहवाल मुख्यालयाला पाठविण्यात येणार आहे.

नवी मुंबई विमानतळ पाच टप्प्यांत उभारले जाणार आहे. टप्पा क्रमांक १ आणि २ एकत्रित पूर्ण केले जाणार आहे. यात एक टर्मिनल आणि एक रन वे असणार आहे. ३१ मार्च २०२५ पर्यंत हा टप्पा व्यावसायिक वापरासाठी खुला होईल. याअंतर्गत दोन कोटी प्रवासी प्रवास करू शकतील, असा अंदाज आहे. तर टप्पा क्रमांक ३, ४ आणि ५ मध्ये तीन टर्मिनल आणि एक रन वे असणार आहे.

या टप्प्यानंतर वार्षिक ९ कोटी प्रवासी वाहतूक होईल, असा अंदाज सिडकोकडून व्यक्त केला जात आहे. या यशस्वी चाचणीमुळे आता काही महिन्यानंतर या विमानतळावरुन प्रवास करण्याचे नवी मुंबईकरांसह रायगडवासियांचे स्वप्न साकार होणार आहे.

१३ जुलै रोजी केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री किंजरापू नायडू आणि राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांनी विमानतळाच्या कामाचा आढावा घेऊन मार्च २०२५ पासून येथून विमानाचे उड्डाण होणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर बुधवारी अचानक नवी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवरून ही विमान चाचणी घेण्यात आली. यामुळे विकासक कंपनी आणि सिडकोचा विश्वास दुणावला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -