मुंबई: पावसाळ्याच्या दिवसांत वातावरण अतिशय हिरवेगार तसेच आल्हाददायक असते. मात्र यादिवसांमध्ये आपल्या आरोग्याची काळजी घेणेही तितकेच गरजेचे असते. या मोसमात अशा काही भाज्या खाऊ नयेत ज्यामुळे पोटाशी संबंधित आजार सतावू शकतात. या भाज्यांमध्ये किटाणू तसेच बॅक्टेरिया मोठ्या प्रमाणात वाढतात त्यामुळे याचा पचनसंस्थेवर मोठा परिणाम होऊ शकतात.
हिरव्या भाज्या
हिरव्या भाज्या जसे पालक, कोबी आणि सलाड सारख्या भाज्या लवकर दूषित होतात. यात किटाणू आणि किडे लवकर वाढतात. यामुळे पोटाशी संबंधित आजार होण्याचा धोका असतो त्यामुळे पावसाळ्यात या भाज्या खाऊ नयेत.
मशरूम
पावसाळ्यात मशरूम खाऊ नयेत. मशरूम ओलाव्यामुळे लवकर खराब होतात. यामध्ये हानिकारक बॅक्टेरिया तसेच विषारी पदार्थ वाढू शकतात. यामुळे पोटाच्या समस्या तसेच आजार वाढण्याची शक्यता असते. याऐवजी तुम्ही दुधी भोपळा, तोंडली, भोपळा या भाज्यांचे सेवन करू शकता.
वांगी
पावसाळ्याच्या दिवसांत वांगी खाऊ नयेत. या मोसमात वांग्यामध्ये किडे तसेच बॅक्टेरिया लवकर वाढतात. यामुळे पाचनसंस्था बिघडू शकते.
फ्लॉवर
फ्लावरमध्ये पावसामुळे छोटे छोटे किडे तसेच बॅक्टेरिया होतात. हे धुवून जात नाहीत. तसेच पावसाळ्यात फ्लॉवर खाल्ल्याने पोटात गॅस तसेच अपचनाचा त्रास होऊ शकतो.