Thursday, August 29, 2024
Homeदेशओमानच्या किनाऱ्यावर बुडालेल्या जहाजातील १३ भारतीयांसह १६ क्रू मेंबर्स बेपत्ता!

ओमानच्या किनाऱ्यावर बुडालेल्या जहाजातील १३ भारतीयांसह १६ क्रू मेंबर्स बेपत्ता!

नवी दिल्ली : ओमानमधून (Oman) एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. ओमानमधून येमेनच्या दिशेने जाणारे तेलवाहू जहाज बुडाल्याची (Oil Tanker Sinks) माहिती मिळत आहे. यामध्ये १३ भारतीय व ३ श्रीलंकेचे नागरिक होते. मात्र या अपघातात सर्वजण बेपत्ता झाले असून अद्यापही या १६ क्रू मेंबर्सबाबत कोणतीही माहिती हाती लागली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, या तेलाच्या टँकरचं नाव प्रेस्टीज फाल्कन आहे. सोमवारी १५ जुलै रोजी ही जहाज बुडाल्याची घटना घडली असून तेव्हापासून सर्व कर्मचारी बेपत्ता आहेत. ओमानच्या सागरी सुरक्षा केंद्राने मंगळवारी १६ जुलै रोजी याबाबतची माहिती दिली. सुरक्षा केंद्राने सांगितले की, प्रेस्टीज फाल्कन (Prestige Falcon) नावाचे तेलवाहू जहाज दुबईच्या बंदरावरून निघाले होते. ओमानमधील येमेन ऐडन बंदराकडे येत असताना हा अपघात घडला.

दरम्यान, जहाजावरील बेपत्ता झालेले सर्व कर्मचाऱ्यांचा शोध घेण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र दोन दिवस उलटूनही अद्याप कोणत्याही कर्मचाऱ्याचा शोध लागला नसून सर्वत्र खळबळ उडाली आहे.

ओमानच्या दक्षिण-पश्चिम किनारपट्टीवर स्थित असणारा ड्यूकम बंदर शहराजवळ रास मदारकाच्या आग्नेय-पूर्वेला २५ नॉटिकल मैलांवर बुडाले. हे तेलवाहू जहाज पाण्यात बुडाले असून पलटी झाले होते. दरम्यान, जहाज पुन्हा स्थिर झाले की नाही तसेच जहाज बुडाल्यानंतर समुद्रात त्यातून तेल गळती झाली आहे की नाही? याची अद्याप पुष्टी झालेली नाही. दरम्यान बेपत्ता कर्मचाऱ्यांचा कसून शोध घेतला जात आहे, अशी माहिती माहिती मरीटाईम सिक्युरिटी सेंटरने (एमएससी) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -