Saturday, May 10, 2025

मनोरंजनताज्या घडामोडी

अनुष्का शर्माच्या बर्थडेला विराट कोहलीने बनवला होता हा स्पेशल केक

अनुष्का शर्माच्या बर्थडेला विराट कोहलीने बनवला होता हा स्पेशल केक

मुंबई: काही महिन्यांपूर्वीच अनु्ष्का शर्मा दुसऱ्यांदा आई बनली. अनुष्काने मुलीच्या जन्मानंतर तीन वर्षांनी यावर्षी फेब्रुवारीमध्ये गोंडस मुलाला जन्म दिला. अनुष्का शर्माने मे मध्ये विराट कोहली, फाफ डू प्लेसिस आणि इतर लोकांसह बंगळुरूमध्ये आपला वाढदिवस साजरा केला होता. त्यावेळेस विराट आणि इतक लोकांच्या डिनर पार्टीचे काही फोटोज समोर आले होते. आता या कपलचा अनसीन फोटो समोर आला आहे.


नुकत्याच एका बेकरने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करताना सांगितले की कसे विराटने अनुष्कासाठी खास केक बनवण्यासाठी तिच्याशी संपर्क केला होता.



बंगळुरूच्या बेकरने अनुष्काच्या बर्थडे केकबद्दल काय म्हटले पाहा...


या बेकरने पोस्ट केलेल्या फोटोत अनुष्का शर्मा निळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. अभिनेत्रीने बंगळुरूस्थित बेकर उत्तिष्ठ कुमार आणि इव्हेंट प्लानर अंजना थॉमस यांच्यासोबत पोझ दिली. उत्तिष्ठाने केक एका मजेशीर टॉपरसोबत सजवला होता. यावर लिहिले होते हॅपी बर्थडे मॅड वन.


 



 










View this post on Instagram























 

A post shared by Uthishta Kumar (@uthishtakumar)





याबाबत बेकर म्हणाली, जेव्हा विराट कोहलीने अनुष्का शर्माच्या वाढदिवसासाठी केक बनवण्यासाठी माझ्याशी संपर्क केला तेव्हा मला माहीत होते की मला काहीतरी खास बनवायचे आहे. बर्थडेच्या सेलिब्रेशनसाठी क्लासिक चॉकलेट केकपेक्षा चांगले आणखी काही असूच शकत नाही.


अनुष्का शर्मा १ मेला ३६ वर्षांची झाली. यावर्षी फेब्रुवारीमध्ये अकाय कोहलीच्या जन्मानंतर तिला पाहिले गेले होते. बंगळुरूमध्ये साजरा करण्यात आलेल्या बर्थडे डिनरच्या फोटोजमध्ये ग्लेन मॅक्सवेल, त्याची पत्नी विनी रमन आणि फाफ डू प्लेसिस यांच्यासोबत ती दिसली होती.

Comments
Add Comment