Sunday, August 10, 2025

Jioच्या या बूस्टर प्लानने रिचार्ज केल्यास ठरणार फायदेशीर

Jioच्या या बूस्टर प्लानने रिचार्ज केल्यास ठरणार फायदेशीर

मुंबई: प्रायव्हेट टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने या महिन्याच्या सुरूवातीच्या रिचार्ज प्लानच्या किंमतीत वाढ केली आहे. यामुळे युजर्सना मात्र चांगलाच फटका बसला आहे. आता कंपनीने युजर्ससाठी तीन नवे प्रीपेड बूस्टर पॅक लाँच केले आहेत. यात युजर्सला अगदी किफायतशीर किंमतीत ५जी डेटा मिळू शकेल. यात ५१ रूपये, १०१ रूपये आणि १५१ रूपयांच्या किंमतीच्या प्लानचा समावेश आहे.



५१ रूपयांचा बूस्टर प्लान


कंपनीने ५१ रूपयांच्या प्लानमध्ये युजर्सला कमी पैशात ५ जी डेटासह ३ जीबी ४जी डेटा ऑफर केली आहे. मात्र यासाठी युजरला आपल्या नंबरवर १.५ जीबी डेली डेटाचा १ महिन्याचा प्लान रिचार्ज करणे गरजेचे आहे. यानंतर ५जी डेटासाठी ५१ रूपयांचा रिचार्ज प्लान घेऊ शकतात.



१०१ रूपयांचा बूस्टर प्लान


जिओच्या १०१ रूपयांच्या प्लानचा फायदा उचलण्यासाठी आधी युजर्ला २ महिन्यांची व्हॅलिडिटी असलेल्या १.५ जीबी डेटा अथवा १ जीबी डेटा प्लान रिचार्ज करावा लागेल. यानंतर त्यांना १०१ रूपयांच्या बूस्टर प्लानमध्ये मिळणारे फायदे घेऊ शकतील. यात ६ जीबी ४ जी डेटासह अनलिमिटेड डेटा मिळेल.



१५१ रूपयांचा बूस्टर प्लान


ज्या युजर्सला जास्त डेटाची गरज आहे त्यांच्यासाठी जिओचा १५१ रूपयांचा बूस्टर प्लान फायदेशीर ठरू शकतो. या प्लानमध्ये ९ जीबी डेटासह अनलिमिटेड ५जीचा फायदाही मिळेल. यासाठी युजरकडे एक ते दोन महिने १ जीबी अथवा १.५ जीबी डेली डेटाचा पॅक असणे गरजेचे आहे.

Comments
Add Comment