पुणे : गेल्या काही दिवसांपासून आयएएस अधिकारी ३२ वर्षीय पूजा खेडकर (Pooja Khedkar) प्रचंड चर्चेत आल्या आहेत. पुण्यात केवळ प्रोबेशनरी अधिकारी असताना एखाद्या जिल्हाधिकाऱ्यालाही लाजवेल अशा सरंजामी थाटामुळे त्यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले. पूजा खेडकर यांचे उत्पन्न, श्रीमंत थाट ते त्या सनदी अधिकारी होण्यास कशाप्रकारे पात्र नव्हत्या, याबाबत उलटसुलट चर्चा सुरु झाल्या. त्यातच आणखी एका प्रकरणामुळे त्यांचे आईवडील देखील चर्चेत आले आहेत. त्यांच्या पालकांशी संपर्क होत नसून पुणे पोलिसांनी त्यांना शोधण्यासाठी पाथर्डी आणि मुंबईमध्ये मोठी छापेमारी केली आहे. तर पूजा खेडकर यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांबद्दल वाशिम पोलिसांनी त्यांची तब्बल ३ तास चौकशी केली.
पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर आणि वडील दिलीप खेडकर यांचा पुणे पोलीस शोध घेत आहेत. पुणे ग्रामीण पोलिसांच्या पौड पोलीस ठाण्यात मनोरमा खेडकर आणि दिलीप खेडकर यांच्यासह पाच जणांवर गुन्हे दाखल आहेत. या सगळ्यांवर बंदुकीने धाक दाखवत शेतकऱ्यांना धमकवल्याचा आरोप आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे त्यांचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांची पाथर्डीसह मुंबईतील विविध ठिकाणी मोठी छापेमारी सुरू आहे. पाथर्डी तालुक्यातील भालगाव येथील फार्म हाऊसवर देखील पोलिसांनी छापेमारी केली.
दरम्यान, पूजा खेडकर यांच्या आईला शस्त्र परत करण्यासाठी देखील काल पुणे पोलिसांनी नोटीस बजावली होती. त्यानंतर आता पूजा खेडकर यांच्या पालकांशी संपर्क होत नसल्यामुळे दाखल झालेल्या गुन्ह्याची चौकशी करण्यासाठी पुणे पोलीस विविध शहरांत त्यांचा शोध घेत आहेत.
पूजा खेडकर यांची वाशिम पोलिसांनी तब्बल तीन तास चौकशी केली. उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्यासह दोन अधिकाऱ्यांकडून वाशिम येथील शासकीय विश्रामगृहात पूजा खेडकर यांची काल मध्यरात्री चौकशी करण्यात आली. बंद खोलीत ही चौकशी झाली असल्याने चौकशीत खेडकर यांना काय विचारण्यात आलं? याबाबत कळू शकलेलं नाही. दरम्यान, चौकशीनंतर पूजा खेडकर यांनी माध्यमांसोबत बोलण्यास नकार दिला.
पूजा खेडकर या महाराष्ट्र केडरच्या २०२२ च्या बॅचमधील IAS अधिकारी आहेत. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांची पुण्यात प्रोबेशनरी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती. प्रोबेशनरी अधिकाऱ्यासाठी स्वतंत्र केबिन किंवा गाडीची सुविधा नसते. मात्र, पूजा खेडकर या स्वत:च्या खासगी ऑडी गाडीवर लाल-निळा दिवा आणि महाराष्ट्र शासन अशी नेमप्लेट लावून फिरायच्या. याशिवाय, पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याचे अँटी चेंबर बळकावून पूजा खेडकर यांनी तिकडे स्वत:चे कार्यालय थाटले होते. या कार्यालयातील फर्निचरही पूजा खेडकर यांनी बदलले होते. या सगळ्या सरंजामी थाटामुळे पूजा खेडकर या सरकारी अधिकाऱ्यांच्या वर्तुळात चर्चेचा विषय ठरल्या होत्या. अखेर पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र लिहून त्यांच्या बदलीची शिफारस केल्यामुळे हा सर्व प्रकार उघड झाला होता.
त्यानंतर याप्रकरणी नवनवीन धक्कादायक खुलासे झाले. त्यांनी नाव बदलून परीक्षा दिल्याचं देखील समोर आलं आहे. तर त्यांनी युपीएससी प्रशासनाला दिलेल्या दिव्यांगत्व प्रमाणपत्रावर देखील संशय व्यक्त केला जात आहे. त्याचीही चौकशी होण्याची दाट शक्यता आहे. पूजा खेडकर यांच्यानंतर त्यांचे आईवडिल देखील वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार,…
ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांचे परवाने रद्द होणार मुंबई (प्रतिनिधी) : बनावट पनीर किंवा चीन ऍनालॉग वापरणाऱ्यांवर…
पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…
काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…