नवी दिल्ली : दिल्लीतील लुटियन्स जोन्सचा बंगला रिकामा करण्यासाठी २०० हून अधिक माजी लोकसभा खासदारांना नोटीस बजावण्यात आली आहे.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या खासदारांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. नियमानुसार, एक महिन्याची मर्यादा ओलांडूनही या खासदारांनी बंगला रिकामाला केला नसल्याने त्यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे, असं सांगण्यात येत आहे.
माजी खासदारांना लोकसभेच्या गृहनिर्माण समितीने आपले बंगले लवकरात लवकर रिकामे करण्यास सांगितले आहे, जेणेकरून नवीन खासदारांना या बंगल्याचे वाटप केले जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.