Saturday, October 25, 2025
Happy Diwali

MPSC Result : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्यसेवा मुख्य लेखी परीक्षेचा निकाल जाहीर

MPSC Result : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्यसेवा मुख्य लेखी परीक्षेचा निकाल जाहीर

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे जानेवारी २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या राज्य सेवा (मुख्य) परीक्षा २०२३ या परीक्षेचा निकाल (MPSC Result) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिनांक २०, २१ व २२ जानेवारी, २०२४ रोजी ही परीक्षा घेण्यात आली होती. हा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. (MPSC) मुख्य परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थी मुलाखतीसाठी पात्र झाले आहेत. मुलाखतीचा सविस्तर कार्यक्रम आयोगाच्या (https://mpsc.gov.in) या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल, असे आयोगाकडून सांगण्यात आले आहे.

मुख्य परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थी मुलाखतीसाठी पात्र झाले आहेत. मुलाखतीचा सविस्तर कार्यक्रम आयोगाच्या (https://mpsc.gov.in) या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल, असे आयोगाकडून सांगण्यात आले आहे.

राज्य सेवा मुख्य परीक्षेच्या निकालानुसार मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची वैद्यकीय तपासणी मुलाखतीच्या टप्प्यावर आयोगाकडून करण्यात येईल. त्या अनुषंगाने उमेदवारांना वैद्यकीय चाचणीची तारीख व ठिकाण आयोगाकडून कळवण्यात येणार आहे.

निकालानुसार मुलाखतीसाठी प्रथमदर्शनी पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांना त्यांच्या परीक्षेच्या आवेदनपत्रातील दाव्याच्या पृष्ठ्यर्थ मुलाखतीच्या वेळी त्यांची पात्रता मूळ प्रमाणपत्रावरून तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून मुलाखतीस बोलावण्यात येणार आहे, असे आयोगाकडून सांगण्यात आले. लेखी परीक्षेच्या निकालाआधारे मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारांचा मुलाखत कार्यक्रम स्वतंत्रपणे प्रसिध्द करण्यात येणार आहे.

मुख्य परीक्षेमधून मुलाखतीसाठी अर्हताप्राप्त न ठरलेल्या ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपुस्तिकेतील गुणांची फेरपडताळणी करावयाची आहे अशा उमेदवारांनी गुणपत्रक प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून १० दिवसांच्या आत आयोगाकडे ऑनलाईन पध्दतीने विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >