मुंबई: ज्या लोकांना वारंवार थकवा जाणवत असतो अथवा जे सतत आजारी असतात त्यांनी आपल्या शरीरातील ही लक्षणे अजिबात दुर्लक्षित करू नयेत. कारण ही लक्षणे म्हणजे शरीरातील पोषणतत्वांची कमतरतेमुळे आढळतात.
शरीरासाठी व्हिटामिन्स आणि मिनरल्स खूप महत्त्वाचे असतात. आपल्या शरीरात होणाऱ्या अनेक प्रकारच्या फिजिओलॉजिकल फंक्शनला प्रभावित करतात.
शरीरासाठी महत्त्वाचे व्हिटामिन्स म्हणजे व्हिटामिन ए, व्हिटामिन बी, व्हिटामिन सी, व्हिटामिन डी, व्हिटामिन ई, व्हिटामिन के, कॅल्शियम, आयर्न, झिंक, सेलेनियम आणि क्रोमियम यांचा समावेश आहे.
रिसर्चनुसार भारतीयांच्या शरीरात व्हिटामिन्सची कमतरता असते. अनेकदा व्हिटामिन बी१२ आणि व्हिटामिन डीच्या कमतरतेमुळे शरीरात रक्ताची कमतरता जाणवते.
व्हिटामिन्सच्या कमतरतेमुळे अंग दुखी, झोपेची कमतरता आणि हात-पायांची दुखी हे त्रास जाणवतात. असे लक्षण असतील तर तुम्ही भरपूर फळे खाल्ली पाहिजेत.