अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत एक उमेदवार असलेल्या डोनाल्ड ट्रंप यांच्यावर जीवघेणा गोळीबार करण्यात आला आहे. आता त्यांची हालत धोक्याच्या बाहेर असल्याचे सांगितले जात आहे. पण हा हल्ला कुणी केला असावा याची कल्पना येणे आवश्यक आहे. डोनाल्ड ट्रंप यांच्यावर जो गोळीबार करण्यात आला त्यावरून एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे की, त्यांच्यावर आपल्याच माणसांकडून गोळीबार करण्यात आला आहे. आगामी ५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत गोळीबार करणारा तरुण थाँमस मॅथ्यूज हा गणित आणि विज्ञान विषयाचा पुरस्कार विजेता राहिलेला आहे. तोच हल्लेखोर आहे. त्यानेच ट्रम्प यांच्यावर गोळ्या झाडल्या. २० वर्षीय हल्लेखोराने त्यांच्यावर गोळ्या का झाडल्या याचा तपास लावण्यात एफबीआयला अजून अपयश आले आहे.
अमेरिका एक लोकतांत्रिक व्यवस्था होण्यापेक्षाही अनेक नेते गोळीबारीचे शिकार झाले आहेत. प्रत्येक हत्येच्या मागे एक कारण असते. ट्रम्प यांच्यावर गोळीबारामागे कोणते कारण असावे याचा तपास कारणाचा शोध घेणे सुरू आहे. याचा अर्थ प्रत्येक हत्येमागे कुणाला न कुणाला त्याचा फायदा होत असतो. ट्रम्प यांच्यावर गोळीबार करण्यामागे त्यांची हत्या करण्याचा उद्देश होता हे लपून राहिलेले नाही. मग त्यांच्यावरील या गोळीबाराचा कुणाला लाभ होणार होता याचा शोध लावण्याची गरज आहे. अमेरिकन अध्यक्ष जो बायडेन यांनी ट्रम्प यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली आणि त्यांच्यावरील या गोळीबाराची निंदाही केली असल्याची चर्चा आता सुरू आहे. पण रिपब्लिकन पार्टीमध्ये मात्र या गोळीबाराच्या घटनेनंतर आश्चर्यकारकरीत्या सन्नाटा पसरलेला आहे. माजी अध्यक्ष ओबामा यांनी ही घटना निंदनीय असून राजकारणात हिंसाचाराला काही स्थान नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे. प्रथमच निवडून आलेल्या अध्यक्षांविरुद्ध प्रचंड बवाल झालेला अमेरिकेने पाहिला तसेच ट्रम्प यांच्यावर वेगवेगळे आरोप झालेले पाहिले आहेत.
ट्रम्प यांच्याविरोधात रस्त्यावर उतरून निदर्शने झालेलीही पाहिली आहे, तसेच अमेरिकन अध्यक्षांविरोधात लोक रस्त्यावर उतरल्याचे दिसले आहे. ट्रम्प यांची कारकीर्द अनेक कारणांमुळे वादग्रस्त ठरली आहे. त्यांनी कित्येक आपल्या विरोधकांना राजकारणातून हद्दपार केले आहे तसेच एका अमेरिकन मॉडेल प्रकरणात त्यांच्याविरोधात त्यांनी नुकतेच सेक्स स्कँडल केले त्यावरून त्याची छी थू झाली आहे. या साऱ्या प्रकरणात ट्रम्प यांचा दोष आहे असे म्हणता येत नाही. पण त्यांच्यावर संशयाची सुई जी फिरते त्यासाठी ते निश्चितच दोषी आहेत. देशात जो एक नॅरेटिव्ह जो बनला आहे तो असा आहे की, पाकिस्तानातील जे मूळ पाकिस्तानी आहेत ते ट्रम्प यांना हरवण्याचा प्रयत्न करणार हे उघड आहे. पण हा नॅरेटिव्ह सिद्ध करता आलेला नाही. पण ज्यो बायडेन यानी जे राष्ट्राला उद्देशून संबोधन केले आहे त्यात हिसेंला स्थान नसल्याचे म्हटले आहे. गोळीबाराचा विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी स्पष्ट शब्दांत निषेध केला आहे. त्यावरून अध्यक्षपदासाठी दावेदार असलेल्या ट्रम्प यांच्यावरील गोळीबारात बायडेन यांचा हात नाही असा संशय दूर झाला आहे. पेनसिल्वहानिया येथे झालेल्या गोळीबारानंतर जगभरात खळबळ माजली होती.
अमेरिकेत राजकीय वातावरण तापले असतानाच विद्यमान अध्यक्ष जो बायडेन यांनी देशाला उद्देशून संबोधन केले असून या प्रकरणी शांतता बाळण्याचे आवाहन केले आहे. या हल्ल्यात एका माजी राष्ट्राध्यक्षांवर गोळीबार झाला आणि एका निरपराध अमेरिकन नागरिकाचा बळी गेला आहे. हा नागरिक आपल्या पसंतीच्या उमेदवार आपला पाठिंबा व्यक्त करण्यासाठी तेथे जमला होता. त्याची हत्या झाली. अमेरिकेसाठी ही लांच्छनास्पद घटना आहे. अमेरिकेच्या इतिहासावर नजर टाकली असता कोणत्याही प्रश्नाचे उत्तर हिंसा हे असू शकत नाही, असे जो बायडेन यांनी म्हटले आहे. सध्या देशात हिंसेने राजकीय वातावरण तापले आहे. अमेरिकेत राजकीय हिंसा नेहमीच होते. पण या निवडणुकीत कधी नव्हे इतकी ती त्वेषाने केली जात आहे. अमेरिकेसाठी हे भूषणावह नाही. या निवडणुकीतील जनतेने केलेली निवड ही पुढील काही दशके अमेरिकेचे भविष्य ठरवणार आहे.
आपल्या भाषणात बायडेन यानी अमेरिका हे एकसंध राहण्यावर जो भर दिला आहे तो कौतुकास्पद आहे. पण त्यांचे हे अरण्यरूदन ठरू नये. राजधानीवर झालेल्या ६ जानेवारीच्या हल्ल्याचा उल्लेखही ज्यो बायडेन यांनी केला आहे. त्यामुळे नागरिकांनी या प्रकरणी जरा सबुरीने घ्यावे असे आवाहन त्यांनी केले आहे. थाँमस मॅथ्यूज हा घटनास्थळीच सुरक्षा रक्षकांच्या गोळीबारात ठार झाला. त्यामुळे या प्रकरणामागे कोण आहेत हे आता कधीच समोर येणार नाही. तसेच कुणी या थाँमस मॅथ्यूजला उकसवले आणि षडयंत्रामागे कोण आहेत हेही कधी समोर येणार नाही. त्यामुळे हे प्रकरण तसेच आता बाजूला पडले आहे. पण अमेरिकन अध्यक्षही सुरक्षित नाहीत हे यानिमित्ताने पुन्हा सिद्ध झाले आहे. आता अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील हे प्रकरण इतिहास जमा झाले असले तरीही त्याचे कवित्व अनेक वर्षे चालूच राहणार आहे.