Sunday, May 11, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

मुंबईच्या महिलेला शेअर मार्केटचा मोह पडला भारी, गमावले तब्बल इतके लाख रूपये

मुंबईच्या महिलेला शेअर मार्केटचा मोह पडला भारी, गमावले तब्बल इतके लाख रूपये

मुंबई: सायबर गुन्ह्याच्या दर दिवसाला काही ना काही केसेस समोर येत असतात. अशीच एक केस समोर आली आहे. येथे महिलेची फसवणूक करण्यात आली आहे.


महिलेला सायबर गुन्हेगारांनी काही दिवसांत पैसे डबल करणार असल्याची स्वप्ने दाखवली होती. यानंतर महिलेला ऑनलाईन ट्रेडिंगबद्दल सांगितले. ज्यातून तिला मोठी कमाई करण्याचे लालूच दाखवले.


४२ वर्षीय ही महिला या जाळ्यात अडकली आणि तिने आपले तब्बल १३ लाख रूपये गमावले. पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत महिलेने म्हटले की, ती इन्स्टाग्राम पाहत होती. यावेळेस तिला एक ऑनलाईन ट्रेडिंग स्कॅमची जाहिरात दिसली.


येथे तिला हाय रिटर्नची लालूच दाखवण्यात आली होती. येथे काही दिवसांतच तुम्हाला पैसे डबल करून मिळतील असे सांगण्यात आले होते. या जाळ्यात ही महिला अडकली आणि तिने त्यावर क्लिक केले.


मिडिया रिपोर्ट्सनुसार महिलेने जेव्हा जाहिरातीवर क्लिक केले तेव्हा तिला एका व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सामील करण्यात आले. तेथे स्टॉक मार्केटसंबंधित टिप्स दिल्या.यानंतर महिलेची फसवणूक सुरू होती. तब्बल २ महिने असे सुरू होती. यादरम्यान १२ ट्रान्झॅक्शनद्वारे १३.८३ लाख रूपये ट्रान्सफर करण्यात आले.


दरम्यान, जेव्हा महिलेने आपले काही पैसे काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिला ते पैसे काढता येईना यावेळेस तिला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. महिलेने जेव्हा या प्रकरणातील डिटेल्स मागितल्या तेव्हा ३० टक्केच्या हिशेबाने तिच्याकडे ३.९० लाख रूपयांची मागणी करण्यात आली. जेव्हा तिने हे पैसे देण्यास नकार दिला तेव्हा तिला ग्रुपमधून काढून टाकण्यात आले.

Comments
Add Comment