श्रीनगर: जम्मू-काश्मीरच्या(Jammu-kashmir) डोडा जिल्ह्यातील एका जंगली क्षेत्रात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत एका सैन्य अधिकाऱ्यांसह ४ जवान शहीद झाले आहेत. अधिकाऱ्यांनी ही माहिती मंगळवारी दिली.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रीय रायफल्स आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या विशेष अभियान समूहाच्या जवानांनी रात्री साधारण पावणे आठ वाजता सुरक्षा तसेच घेरावबंदी अभियान सुरू केले. यानंतर दहशतवादी आणि जवान यांच्यात ही चकमक झाली.
२० मिनिटांहून अधिक सुरू असलेल्या या गोळीबारात एका अधिकारीसहित चार सैन्याचे जवान आणि एक पोलीस जखमी झाले. अधिकाऱ्यांनी सांगितले की जखमींना रुग्णालयात आणले जात होते त्यांची स्थिती गंभीर झाली होती. यातील चार जणांचा मृत्यू झाला.
Four soldiers, including an officer, critically injured in a gunfight with terrorists succumbed in J&K’s Doda: officials
— Press Trust of India (@PTI_News) July 16, 2024
या हल्ल्याची जबाबदारी दहशतवादी संघटना काश्मीर टायगर्सने घेतली आहे. डोडामध्ये सुरक्षारक्षक अधिकाऱ्यांचे सर्च ऑपरेशन सुरू आहे.गेल्या काही आठवड्यांपासून जम्मू क्षेत्रात सुरू असलेल्या अनेक स्थानांवरील दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा रक्षक हाय अलर्टवर आहेत. १६ आर्मी कोर, ज्यांना व्हाईट नाईट कोर म्हणूनही ओळखले जाते त्यांनी सांगितले की अतिरिक्त जवानांनी कुमक डोडामध्ये पाठवण्यात आली आहे. संपूर्ण परिसरात सर्च ऑपरेशन सुरू आहे.