मुंबई : आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे राज्यात सर्वत्र भक्तीमय वातावरण झाले आहे. अशातच विठठ्लाच्या नावाचा गजर करत पायी चालत जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी एक मोठी घोषणा केली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी ‘वारकरी महामंडळ’ची (Warkari Mahamandal) स्थापना करणार असल्याची घोषणा केली होती. त्याअंतर्गत आता पायी जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी पेन्शन योजना (Warkari pension yojana) सुरु करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे वारकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
राज्य सरकार परंपरेने महिन्याची वारी करणाऱ्या वारकऱ्यांना वृद्धापकाळात वारकरी पेन्शन लागू करणार आहे. या योजनेमुळे राज्यभरातील लाखो वारकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी मुख्यमंत्री वारकरी महामंडळच्या (Mukhyamantri Varkari Sampradaya Mahamandal) वतीने शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
वारकरी महामंडळाचं मुख्यालय हे पंढरपुरात असणार आहे. प्रशासकीय सेवेतील अधिकारी किंवा निवृत्त अधिकाऱ्यांची महामंडळावरती व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती केली जाणार आहे. महामंडळाचं भांडवल ५० कोटी इतकं असणार आहे. तसेच, कीर्तनकारांना आरोग्य विमा कवचही दिलं जाणार आहे.
महाराष्ट्रातील तमाम वारकऱ्यांसाठी स्वतंत्र वारकरी महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये वारकऱ्यांच्या प्रश्नांचे निराकरण केलं जाणार आहे. तसेच, वारकऱ्यांना पेन्शन लागू केलं जाणार आहे. या महामंडळाच्या माध्यमातून पंढरपूरच्या विकासाला देखील गती येईल. प्रामुख्याने वारकरी संप्रदायाच्या अडीअडचणी प्रश्न सोडवणे, सर्व पालखी सोहळा मार्गाची सुधारणा करणे, वारकरी भजनी मंडळाला भजन व कीर्तन साहित्य करिता अनुदान देणे अशा अनेक मुद्द्यांच्या आधारे हे महामंडळ निर्माण करण्यात आलं आहे. मुख्यमंत्र्यांकडून वारकरी महामंडळाच्या आदेशाची प्रत वारकऱ्यांना देण्यात आली आहे.
रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…
नागपूर: विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…
बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…
नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…