Thursday, August 7, 2025

Jio आणि Airtel साठी डोकेदुखी ठरतोय BSNLचा हा प्लान!

Jio आणि Airtel साठी डोकेदुखी ठरतोय BSNLचा हा प्लान!

मुंबई: देशातील प्रायव्हेट टेलिकॉम कंपन्या आपल्या प्लान्सच्या किंमतीत वाढ करत आहेत. दुसरीकडे सरकारच्या अंतर्गत काम करणारी बीएसएनएल युजर्ससाठी देशभरात ४ जी सर्व्हिस सुरू करत आहे.



BSNL ला होत आहे फायदा


जिओ, एअरटेल आणि व्हीआयच्या रिचार्ज प्लानमध्ये वाढ झाल्याने बीएसएनएलला खूप फायदा झाला आहे. लोक स्वस्त प्लानमुळे आपले सिम बीएसएनएलमध्ये पोर्ट करत आहे. ४जी सर्व्हिस सुरू झाल्यानंतर आणखी युजर्स बीएसएनएलशी जोडले जाऊ शकतात.


जर आपण बीएसएनएलच्या चांगल्या प्लान्सबद्दल बोलायचे असेल तर सर्वाधिक ज्या प्लानची चर्चा होत आहे तो ३९५ दिवसांचा प्लान. यात मिळणारी सुविधा लोकांना आवडत आहे. सगळ्यात विशेष म्हणजे बाकी कंपन्यांच्या तुलनेने हा प्लान खूप स्वस्त आहे.



BSNLचा ३९५ रूपयांचा प्लान


बीएसएनएलचा ३९५ रूपयांचा प्लान तुम्हाला २३९९ रूपयांना मिळेल. यात युजरला दररोज २ जीबी डेटा मिळतो. याशिवाय देशभरातली इतर सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉईस कॉलचेही फायदे मिळत आहेत. याशिवाय यात १०० एसएमएसची सुविधाही मिळत आहे. इतर फायद्यांबद्दल बोलायचे झाल्यास यात झिंग म्युझिक, बीएसएनएल ट्यून्स, हार्डी गेम्स, चॅलेंजर एरिना गेम्स आणि गेम ऑन एस्ट्रोटेल या सुविधा मिळतात.

Comments
Add Comment